राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी नुकतीच सावरगाव हडप येथील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माअंतर्गत स्थापना करण्यात आलेल्या आयडियल ऍग्री टेक प्रोड्युसर कंपनीला भेट दिली. यावेळी त्यांनी कंपनीच्या चालू असलेल्या कामकाजाची माहिती घेतली. तसेच प्रतवारी केंद्राचे उद्घाटन धीरजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांना कृषी प्रक्रिया उद्योगात उतरण्याचा सल्ला दिला. यावेळी आत्माचे संचालक किसन मुळे, विभागीय कृषी सहसंचालक दिनकर जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, विजय माईनकर, अभिमन्यू मगर, तालुका कृषी अधिकारी संतोष गाडे, आत्माचे दत्तात्रय सूर्यवंशी, अर्जुन मद्दलवार यांची उपस्थिती होती.
यावेळी विजेची समस्या व गटशेतीस मुदतवाढ याबाबत निवेदन दिले. यावेळी कृषिभूषण रवींद्र गोलडे, भगवान डोंगरे, श्रीहरी काळे, संजय सोळुंके, बाळासाहेब तनपुरे, सुभाष बोडखे, सुरेश खंडाळे, ज्ञानेश्वर तौर, अशोक जाधव, गीता खांडेभराड, संजीवनी जाधव आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
सावरगाव हडप येथे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालकांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.