लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सतत दुष्काळामुळे दरवर्षी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेती व्यवसायही अडचणीत आला आहे. परिणामी, शेतकरी शेततळ््याच्या माध्यमातून पिकांना पाणी देत आहे. त्यानुसार जालना तालुक्यात मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शेततळी तयार करण्यात आली आहेत. यावर्षी दिलेल्या १९७ शेततळ््यांचे अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाही.तालुक्यात दरवर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. शेतकऱ्यांना कमी पाण्यात पिके घेता यावीत, यासाठी शासनाच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून शेतक-यांना शेततळे दिले जातात. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा), मागेल त्याला शेततळे, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना तसेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, यासारख्या योजना राबविण्यात येतात.त्यानुसार जालना तालुक्यात गेल्या तीन वर्षात २२५९ शेतक-यांना शेततळी देण्यात आली आहेत. यात ५११ सामूहिक शेततळी तर मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत १७४८ शेततळी देण्यात आली आहेत.त्यापैकी १४११ शेततळ््यांचे अनुदान शेतक-यांना वितरित करण्यात आले आहे.परंतु, यावर्षी तयार करण्यात आलेल्या १९७ शेततळ््याच्या अनुदानाची शेतक-यांना प्रतीक्षा आहे. अनुदानापोटी १ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. शेततळे तयार करण्यासाठी एका शेततळ्याला ५० हजारांचे अनुदान दिले जाते.
ं१९७ शेततळ्यांच्या अनुदानाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 1:22 AM