फोटो
पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथे सततच्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. रेल्वे गेटपासून शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पाण्यात शेतकऱ्यांना शेत गाठावे लागत आहे.
मागील काही दिवसांपासून पारडगाव परिसरात जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी रस्तेच वाहून गेले आहेत. पारडगाव येथील रेल्वे गेटपासून शेतात जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्यावर पाणी साचले आहे. या पाण्यात शेतकऱ्यांना ये-जा करावी लागत आहे. या रस्त्याचे काम करण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली; परंतु याकडे दुर्लक्ष गेले आहे. प्रत्येक पावसाळ्यात शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करीत शेत गाठावे लागत आहे. सध्या पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी पिके जगविण्यासाठी शेतात जाऊन पिकांतील पाणी काढून देत आहे; परंतु जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्त्याचे काम करावे, अशी मागणी होत आहे.
दोन कोट सोडावे