जालना : इंग्रजी शाळांच्या विविध मागण्यांसाठी इंडिपैडनट इंग्लिश स्कूल असोसिएशन (ईसा) संघटनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.ईसा संघटनेच्यावतीने इंग्रजी शाळांच्या विविध समस्या अनेकवेळा शिक्षण विभागाकडे मांडण्यात आल्या. परंतु, शिक्षणधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले.तसेच शिक्षणाधिकारी शाळा तपासणीच्या नावाखाली जाचक त्रास देत आहे. तसेच १ नोव्हेंबर २०१८ चा शासन आदेश तात्काळ मागे घेण्यात यावा, शिक्षणाधिकाºयावर कारवाई करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आले.याप्रसंगी राजेंद्र दायमा, भरत भांदरगे, अनिल गव्हाणे, गणेश अग्रवाल, संदीप बाहेकर, अभिजीत कावले, अर्जुन भुतेकर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाºयांची उपस्थिती होती.
जि.प.समोर ईसा संघटनेचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 1:07 AM