वडीगोद्री : धुळे सोलापूर महामार्गावर महाकाळा येथे उभ्या असलेल्या ट्रकला कार धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
बुधवार, १ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. धुळे सोलापूर महामार्गावर महाकाळा येथे उभा असलेल्या ट्रक क्रमांक के.ए. ३२ डी. ९२८३ ला बीडकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एम.एच. २० सीएस ६०४१ क्रमांकाच्या कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे.
दरम्यान घटनास्थळी गोंदी पोलीस दाखल झाले असून, या अपघातात जखमी झालेल्यांना छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रक खाली गेलेली कार जेसीबीच्या साह्याने बाहेर काढावी लागली.