शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

पारनेरमध्ये फळबागेला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 1:04 AM

अंबड तालुक्यातील पारनेर येथील डॉ. समी फैसल चाऊस यांच्या फळबागेला शनिवारी दुपारी आग लागली.

लोकमत न्यूज नेटवर्करोहिलागड : अंबड तालुक्यातील पारनेर येथील डॉ. समी फैसल चाऊस यांच्या फळबागेला शनिवारी दुपारी आग लागली. यामध्ये आंबा, चिकू व जांबच्या बागेचे सुमारे १५ एकरचे नुकसान झाले. अंबड अग्निशमन दल व स्थानिकांच्या मदतीने तीन तासात आग आटोक्यात आली. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.पारनेर परिसरात गट क्रमांक ७६ मध्ये डॉ. चाऊस यांची बगायती शेती आहे. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शेतात आग लागली. कडक उन्हामुळे आग आजूबाजूच्या बागेत सरकत गेली.काही अवधीतच आग लागली. आगीमुळे आंब्याची २५ झाडे होरपळली. चिकू बागेतील ३०० व पेरुच्या बागेतील २६० झाडे जळाली. त्यामुळे नुकत्याच आकार घेत असलेल्या आंब्यांचे नुकसान झाले. परिसरात काही शेतकरी शेतात काम करत होते. त्यांनी आरडाओरडा केल्याने लोक जमा झाले. काहींनी मोबाईलवरून ग्रामस्थांना संपर्क साधल्यावर घटनास्थळी गर्दी झाली. शेख हुसेन, बबन खांडेभराड, सखाराम खांडेभराड, राम गडगुळ, भगवान खांडेभराड, जनार्धन बाबर, सलमान तारेख चौस, फैसल बामर, दिनेश माने, सलीम तंबोळी, फारेश चौस अलीम शेख आदींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. अंबड येथील अग्निशमन बंब शेतात पोहचला. खाजगी टँकरही बोलावण्यात आले. तीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. अचानक लागलेल्या या आगीमुळे फळबागेचे नुकसान झाल्याचे डॉ. समी चाऊस यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :fireआगFarmerशेतकरी