केदारखेडा : तडेगाव ते भोकरदन या बसच्या फेºया वाढविण्याची मागणी विद्यार्थ्यांनी वाहतूक नियंत्रकांकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन भोकरदन आगार प्रमुखांनी बसच्या फेºया वाढविल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
भोकरदन तालुक्यातील नळणी, बरंजळा साबळे, बरंजळा लोखंडे येथील शेकडो विद्यार्थी भोकरदन शहरात शिक्षणासाठी ये-जा करतात. महिनाभरापासून शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु तडेगाव ते भोकरदन ही एकच बस सुरू असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. त्यामुळे त्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. यामुळे आर्थिक फटक्यासह शैक्षणिक नुकसान होत होते. त्यामुळे सकाळी नऊ वाजता तडेगाव ते भोकरदन व दुपारी दोन वाजता भोकरदन ते तडेगाव अशा बसफेºया सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे यांनी भोकरदन बस आगाराचे वाहतूक नियंत्रक एन.डी. राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. तीन दिवसांत बस सुरू न केल्यास आगार प्रमुखांच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. या मागणी एसटी महामंडळाने दखल घेतली असून, बसच्या फेºया वाढविल्या आहेत. या निर्णयामुळे सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे, कृष्णा लोखंडे, विठ्ठल लोखंडे, नीलेश साबळे, भगवान साबळे, प्रकाश राऊत, ज्ञानू बकाल, शंकर साबळे, शंकर राऊत, अभिषेक लोखंडे, योगेश लोखंडे, प्रतीक लोखंडे आदींनी समाधान व्यक्त केले.