लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील आयकर भवन तसेच म्हाडा कॉलनीतील पाण्याची होणारी गळती थांबवण्यासाठी आता पालिकेने थेट कोलकत्ता येथून ७०० आणि ३०० मि.मि. व्यासाचा व्हॉल्व्ह मागवला आहे. या जलवाहीनीतून गेल्या काही दिवसांपासून पाणी वाया जात असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते.याची दखल नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल तसेच मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी घेतली. नवीन व्हॉल्व्ह आणण्यासाठी सहा लाख रूपयांचे टेंडर मागवण्यात आले होेते. महाराष्ट्रात सर्वत्र विचारणा केल्यावरही एवढ्या मोठ्या व्यासाचा व्हॉल्व्ह उपलब्ध नसल्याने कोलकत्ता येथून तो मागवण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले.दरम्यान वायाजाणाऱ्या पाण्याचा उपयोग अनेकजण पिण्याचे पाणी भ-यासह अन्य कामासाठी वापरत असल्याचे चित्र आहे.