लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अग्निशमन केंद्रापासून अर्धा किलोमीटर अंतरावर एका काथ्याच्या दोऱ्या वाहून नेणा-या ट्रकला सोमवारी दुपारी अचानक आग लागली.ही घटना अग्निशमन केंद्रापासून अवघ्या अर्धा किलोमीटरवर घडली. असे असताना, पहिला बंब आला त्यावेळी त्यात पुरेसे पाणी नव्हते. त्यामुळे आगीने रौद्र रूप घरण केले होते. येथील दवा बाजार संकुल जवळ ही घटना घडली.काथ्याने भरलेल्या ट्रकचा आणि विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने ही आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आगीची माहिती अग्निशमन केंद्राला देण्यात आली. परंतु त्यांनी जो बंब आग विझविण्यासाठी आणला होता, त्यात पुरेसे पाणी नसल्याने दुसरा बंब येईपर्यंत आग भडकली होती. त्यात ट्रकचे मोठे नुकसान झाले. ट्रक मधील जवळपास दीड लाख रूपयांचा काथ जळून भस्मसात झाला.गादी तसेच प्लास्टर आॅफ पॅरिस पासून मूर्ती तयार करण्यासाठी तेलंगणा राज्यातील वरंगणा येथील काथ्याला मोठी मागणी आहे. ट्रक क्रमाक टी.एस.०३ यू.बी. ७७७९ दुपारी दवा बाजार परिसरातील व्यापा-याकडे काथा उतरविण्यासाठी आला होता. यावेळी ही आग लागली. यावेळी माध्यमांचे प्रतिनिधी आणि अग्निशमन अधिकाऱ्यांत वादही झाला.
‘बंबा’त पाणीच नाही ! आग भडकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 1:26 AM