शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

बुलेटस्वारांना 'फटाका' राईड पडली महागात; सायलेन्सर जप्त, दंडही भरावा लागला

By दिपक ढोले  | Published: April 06, 2023 4:41 PM

भोकरदन नाका परिसरात पोलिसांनी विशेष मोहीम राबवून केली कारवाई

जालना : फटाके फोडत गाड्या पळविणाऱ्या सात बुलेटस्वारांवर शहर वाहतूक पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली. त्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आकारून सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत.

शहरात कर्णकर्कश हॉर्नवर फाट... फाट...असा  फटाके फोडल्याचा आवाज करत गाड्या पळवून शांतता भंग करण्याचे प्रमाण वाढले आहे. अवैधरीत्या बसविण्यात आलेल्या कर्कश हॉर्न व सायलेन्सरमुळे ध्वनिप्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. या आवाजामुळे शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. शहर वाहतूक शाखेने गुरुवारी सकाळी भोकरदन नाका परिसरात एक तास विशेष मोहीम राबवून १३ बुलेटस्वारांची तपासणी केली. त्यात ७ बुलेट वाहनांना मॉडीफाय केलेले सायलेन्सर बसविल्याचे आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करून दंड आकारण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गुणाजी शिंदे यांनी दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक गुणाजी शिंदे, सपोनि. प्रतापसिंग बहुरे, पोउपनि. वाघ, सपोउपनि. निर्मल, पोकॉ. सुलाने, पोहेकॉ. बनसोड यांनी केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना