लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतक-यांची पहिली औद्योगिक वसाहत जिल्ह्यात परतूर तालुक्यातील आष्टी या गावात होत असून यामाध्यमातून शेतकरी उद्योजक होण्याचा मार्ग प्रशस्त होणार असून, उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. यासंदभार्तील प्रस्ताव लवकर मंजुरीसाठी सादर करण्यात यावा, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील परतूर तालुक्यात रुर्बन व मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाºया विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शासनाचा संकल्प असून त्यादिशेने शासनाची वाटचाल सुरु आहे. यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून या कामाला गती देण्यात येत असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. गाव पातळीवर सूक्ष्म नियोजनातून यासाठी हाती घ्यावयाच्या प्रकल्पांची निश्चिती केली जात आहे. जिल्ह्याने पुढाकार घेऊन रुर्बन तसेच मानव विकास कार्यक्रमांतर्गत तयार केलेला कार्यक्रम त्यादिशेने टाकलेले एक चांगले पाऊल असल्याचे ते म्हणाले.शेतक-यांनी पिकवलेल्या उत्पादनांवर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधून किंवा उद्योगांच्या माध्यमातून प्रकिया केल्या जातील, त्याचे मूल्यवर्धन केले जाईल, यातून शेतकºयांचे उत्पन्न वाढेल, रोजगार संधीची निर्मिती होईल, ३०० कुटुंबांना याचा लाभ मिळेल, असे लोणीकर यांनी सांगितले.राज्यातील असा पहिलाच उपक्रमप्रस्तावित रुर्बन प्रकल्पामध्ये मूलभूत सोयी सुविधा, सर्व सुविधा युक्त ६० उद्योग, यंत्रसामग्री, प्रशिक्षण, क्षमतावृद्धी आणि सहाय्य या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. यासाठी तीन वर्षे कालावधीचा आणि १८५ कोटी रुपये खचार्चा आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रकल्पासाठी २० एकर जागा देखील उपलब्ध करून घेण्यात आली आहे. अशाप्रकारचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम राहणार आहे.
शेतकऱ्यांची पहिली औद्योगिक वसाहत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:42 AM