मंठा : तालुक्यात निम्न दुधना प्रकल्प असून सेलू, परतुर आणि मंठा तालुक्यातील बावीस गावांच्या शिवारात प्रकल्पाची व्याप्ती आहे. या तलावाच्या परिसरात काही गावात मच्छिमार आहेत त्यातील काही मच्छिमार संस्थेसोबत बरोबर व्यवहार करत नाहीत, मारण्याच्या धमक्या देतात, त्यांच्यापासून संरक्षण मिळावे, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती लिंबुरे यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मच्छिमार संस्थाध्यक्ष लिंबुरे यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही शासनाकडून तलावाचा ठेका घेतलेला आहे. परंतू पाडळी येथील काही लोक जाणुन बुजून त्रास देत आहेत, पाडळी हे गाव या तलावाच्या परिसरातील असुन हे गाव परतुर तालुक्यात येते, येथील १० ते १२ लोक सूचना देऊन देखील वारंवार पकडलेल्या माशांचे येथील ठेकेदारांना वजन करुन मालाचे पैसे न देता ठेकेदाराला काठ्या, कुऱ्हाडी घेऊन मारायला येतात व मासे घेऊन जातात. त्यामुळे ठेकेदारांना मानसिक त्रास देऊन आर्थिक झळ पोहोचवित असल्याचे निवृत्ती लिंबुरे यांनी निवेदनात नमुद केले आहे.
...
मंठा ठाणे घेत नाही दखल
मंठा तालुक्यात येणाऱ्या गावांमध्येही काही लोक ठेकेदाराला त्रास देतात, मंठा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारी दिल्या, परंतू पोलीस निरीक्षक निकम हे तक्रारीची दाखल घेत नसल्याने निवृत्ती लिंबुरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.