लोकमत न्यूज नेटवर्कजालना जिल्ह्याची निर्मिती होऊन, आता ३६ वर्ष पूर्ण झाले आहेत. या कालावधीत जवळपास वीस जिल्हाधिका-यांनी येथे जिल्हाधिकारी म्हणून कर्तव्य बजावले आहे. परंतू केवळ पाच जणांनीच त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याचे दिसून आले.जालना जिल्हा झाल्यावर पहिले जिल्हाधिकारी म्हणून रामचंद्र चिन्मुळगुंज हे लभाले होते. त्यांनी एक मे १९८१ ते ३० नोव्हेंबर १९८१, अशी सेवा केली. त्यांच्या नंतर अरूणा बागची यांनी एक वर्ष ७ महिने, नानासाहेब पाटील दोन वर्ष ११ महिने, रविंद्र सुर्वे, २ वर्ष ११ महिने, आनंद कुलकर्णी २ वर्ष पाच महिने, घनशाम तलरेजा चार महिने, भालचंद वीर यांनी मात्र त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला.त्यांच्या नंतर आलेल्या कविता गुप्ता या तेरा महिने राहिल्या. प्रकाश जोशी दोन वर्ष तीन महिने राहिले. जोशी यांच्या नंतर जिल्हाधिकारी म्हणून आलेले श्रीधर पळसुळे यांनी तीन वर्ष एक महिने राहून कार्यकाळ पूर्ण करतानाच जालना महोत्सव घेऊन सांस्कृती क्षेत्रात मोठे उल्लेखनीय काम केले होते. पळसुळे यांच्या नंतर कॅप्टन ए.व्ही. देशपांडे हे जिल्हाधिकारी म्हणून आले होते, त्यांनी एक वर्ष तीन महिने पूर्ण केले.त्यानंतर २००२ ते २००५ या काळात मेरी निलिमा केरेकेट्टा तसेच रणजितसिंह देओल यांनी तीनवर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता. देओल यांच्या जागेवर आलेले आर.डी.शिंदे एकच वर्ष राहिले. शिंदेच्या जागेवर आलेले विलास ठाकूर हे तीन वर्ष राहिले. ठाकूर यांच्या जागेवर आलेले तुकाराम मुंडे हे १४ महिनेच राहिले परंतु या अल्पश: कालावधीत ते नेहमीच तांत्रिक वादाच्या भोवºयात राहिले होते. मंडे यांच्यानंतर श्याम देशपांडे हे रूजू झाले होते. ते एक वर्ष ५ महिने राहिले. एस.आर. नायक हे दोन वर्ष राहिले. त्यांच्या जागेवर आलेले शिवाजी जोंधळे हे दोन वर्षे राहिले. मध्यंतरी निवासी उपजिल्हाधिकारी वामनराव कदम आणि विजयकुमार फड यांनीही अल्प काळासाठी ही जबाबदारी सांभाळली होती.विशेष म्हणजे जालना हे जिल्ह्याचे मुख्यालय असले तरी हव्या तशा नागरी सुविधा, मनोरंजन, शिक्षणाची साधने नसल्याने येथे अधिकारी तसेच त्यांचे कुंटुंबिय येण्यास फारसे उत्सुक नसतात. तसेच आज घडीला तर जालना हे सत्तेचे केंद्र असल्याने येथे आल्यानंतर ऐकावे तरी कोणाचे; हा प्रश्नही अधिकाºयांसमोर निर्माण होत असल्याचे खाजगीत बोलले जाते. त्यामुळे शिवाजी जोंधळे यांची बदली होऊन आता जवळपास महिना होत आहे. तरी देखील नूतन जिल्हाधिकारी म्हणून कोण येणार याचा संभ्रम कायम आहे. सध्या जिल्हाधिकाºयांचा पदभार असलेल्या खपले यांना विविध बैठका निमित्त बाहेरगावी जावे लागत असल्याने जबाबदार अधिकारी नसतो.
२० जिल्हाधिकाऱ्यांपैकी पाच जणांनी केला कार्यकाळ पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 12:58 AM