तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी जिल्ह्यातील उद्योन्मुख खेळाडूंना पुढे चालना मिळावी म्हणून जिल्ह्यात क्रीडा प्रबोधिनीची स्थापना केली. यात संपूर्ण जिल्ह्यातून विविध क्रीडा स्पर्धेत निपुण असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत क्रीडा शिक्षण दिले जात आहे. देशपातळीवरील उद्याचे खेळाडू तयार करणाऱ्या या क्रीडा प्रबोधिनीचा अधिकाधिक विकास व्हावा म्हणून नीमा अरोरा यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना प्रत्येकी १ हजार रुपये आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जाफराबाद तालुक्यातील जि. प. चे सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आदींनी स्वखुशीने या योजनेत सहभाग नोंदविला होता. तालुक्यातून जमा झालेला एकूण ५ लाख ८१ हजार एवढा प्रचंड निधी शुक्रवारी शिक्षण विभागाला सुपूर्द करण्यात आला. या निधी संकलनासाठी जाफराबादचे गटशिक्षणाधिकारी जिनेंद्र काळे, विस्तार अधिकारी एस. आर. फोलाने, राम खराडे, गटसमन्वयक वसंता शेवाळे, साधन व्यक्ती नारायण पिंपळे आदींसह तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्यांनी पुढाकार घेतला.
क्रीडा प्रबोधिनीसाठी शिक्षकांकडून साडेपाच लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:28 AM