शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

मुक्तेश्वर तलावाच्या सुशोभिकरणासाठी पाच कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 1:23 AM

जुना जालना भागातील मुक्तेश्वर तलावाचे खोलीकरण करून त्या परिसरात वॉकिंग ट्रॅकसह, वाचनालय, अत्याधुनिक जिमची व्यवस्था करण्यात येणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जुना जालना भागातील मुक्तेश्वर तलावाचे खोलीकरण करून त्या परिसरात वॉकिंग ट्रॅकसह, वाचनालय, अत्याधुनिक जिमची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असून, भविष्यात आणखी निधीची गरज पडल्यास तोही देऊ असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.पाडव्याच्या मुहूर्तावर दानवेंच्या हस्ते या तलावातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी सांगितले की, मुक्तेश्वर तलाव हा प्रचीन जलस्त्रोत आहे. याचे जतन करण्यासाठी नगरसेवक अशोक पांरगारकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जो पुढकार घेतला तो प्रेरणादायी आहे. यासाठी आमच्याकडून आम्ही आज पाच कोटी रूपयांचा निधी देऊ केला आहे. त्यातून या तलावाचे खोलीकरण चांगल्या पध्दतीने केल्याने आज येथे मोठे पाणी साठले आहे. या परिसराला याचा मोठा लाभ होणार असून, भूगर्भातील पाणीपातळीतही वाढ होणार असल्याचे दानवे म्हणाले.प्रास्ताविक करतांना नगरसेवक अशोक पांगारकर यांनी सांगितले की, मुक्तेश्वर महादेव मंदिर परिसराचा खरा विकास केला तो, मंदिराचे विश्वस्त रामराव देशमुख यांनी त्यांना आम्ही या परिसराचा विकास करण्यासाठी हातभार लावतो असे सांगितल्यावर त्यांनी होकार दिला.या तलावातील गाठ काढण्यासाठी समस्त महजन ट्रस्टसह जिल्हाधिकारी तसेच नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, आ. कैलास गोरंट्याल यांची मदत झाली. नगरसेवकांनी यासाठी पालिकेने पोकलेनसाठीचा डिझेलचा खर्च द्यावा अशी मागणी केली होती. ही मागणी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी मंजूर केल्याचेही पांगारकर म्हणाले.यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, बाजार समितीचे उपसभापती भास्कर दानवे, भाजपचे शहराध्यक्ष सिध्दिविनायक मुळे, भाजपचे सरचिटणीस देविदास देशमुख, शशिकांत जाधव, धीरज मेवाडे, संजय इंगळे, राजेंद्र काला, विजय पांगारकर, सुनील पांगारकर, विनोद सिनगारे, पिंकेश टापर, शशिकांत घुगे आदींची उपस्थिती होती. यावेळी विनायक महाराज फुलंब्रीकर, विजय पाठक यांनी विधिवत पूजा सांगितली.मुक्तेश्वर तलावाचे सुशोभीकरण करतांना वृक्ष लागवड करून पर्यावरण संरक्षणाला महत्व देण्यात येणार आहे.यासाठी वृक्ष लागवडीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामांसाठी खा. दानवे यांनी जो पाठिंबा दिला त्यामुळेच हे शक्य झालल्याचे पांगारकर म्हणाले.

टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवेtourismपर्यटनfundsनिधी