जालना - जनावरांची कत्तल करणाऱ्या पाच जणांना जामखेड येथून अंबड पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. आसेफ अकबर कुरेशी (वय ३५), जाकेर शेख रहीम कुरेशी (वय २७), अन्वय शेख रहीम कुरेशी (वय २४), शकील शेख रहीम कुऱेशी (३५ ता. जामखेड), बिलाल फारूख कुरेशी (वय १८ रा. नेहरू चौक पैठण ता. पैठण) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन जनावरे व चार कुऱ्हाडी असा ५० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जामखेड येथे जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांना खबऱ्यामार्फत मिळाली. या माहितीवरून जामखेड येथे छापा मारून तेथे दोन जनावरांची कत्तल केल्याचे दिसून आले. पोलिसांनी पंचासमक्ष आसेफ कुरेशी, जाकेर कुरेशी, अन्वय कुरेशी, शकील कुरेशी, बिलाल कुरेशी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाचही आरोपींविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिरूध्द नांदेडकर, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप इंगळे, एपीआय नितीन पतंगे, पोलीस कर्मचारी संदीप पाटील, रंगनाथ सोनोने, महेंद्र साळवे, महेंद्र गायके आदींनी केली.