जालना : जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पंचायत राज समितीतील अध्यक्ष आ. सुधीर पारवे यांच्यासह त्यांच्या सहकारी आमदारांनी जालना, अंबड, भोकरदन, जाफराबाद, बदनापूर, घनसावंगी, मंठा आदी तालुक्यांमध्ये भेटी देवून अचानक विकास कामांची पाहणी केली. तर काही सदस्यांनी थेट शाळांमध्ये जावून विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शिक्षकांचा दर्जा आणि शिकविण्याची पद्धत याचा लेखाजोखा घेतला. पंचायत राज समिती जिल्हा दौºयावर येणार असल्याची पूर्व कल्पना देवूनही अनेक ठिकाणी विशेष करून आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागात सुसत्रतेचा आभाव दिसून आला. समितीने अनेक लहान मोठ्या बाबींची गंभीर दखल घेतली आहे. ही समिती आपला अहवाल विधानसभेला सादर करणार आहे. त्यामुळे समितीच्या दौºयाला प्रशासकीय दृष्ट्या मोठे महत्व असते.मंजूर विहिरीचे वाटप नाही : भीमशक्ती संघटनेचे पारवेंना निवेदन४जालना : भिमशक्ती संघटनेच्यावतीने पंचायत राज समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे यांची बुधवारी शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन मागण्यांचे निवेनदन दिले. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस प्रमोदकुमार रत्नपारखे यांनी सांगितले की, मागासवर्गीय लाभार्थ्यांना रोजगार हमी योजनेतून विहिरी मंजूर करतांना त्यात निकष डावल्यात आले आहेत. १२ डिसेंबर २०१२ रोजी जो शासन आदेश काढला होता, त्यात राखीव प्रवर्गासाठी अनुक्रमे १३ आणि ७ टक्के विहिरी द्यायला हव्या. परंतु जिल्ह्यात जवळपास दोन हजार विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. असे असताना शासन आदेशानुसार याचे वाटप न झाल्याने खºया लाभार्थ्यांवर अन्याय झाल्याचे रत्नपारखे यांनी पंचायत राज समितीचे अध्यक्ष पारवे यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. पारवे यांनी याची गंभीर दखल घेत या बाबत चौकशी केली जाईल असे आश्वासन दिल्याचे रत्नपारखे यांनी सांगितले.बिल आमच्याकडे द्या४समितीच्या सदस्यांची निवास तसेच येण्या जाण्यासाठी जो खर्च आला त्याची बिले जिल्हा परिषदेने आमच्याकडे द्यावीत, आम्ही पारदर्शीपणे दौºयावर आलो आहोत. परंतू, काही चुकीची अफवा पसरवून समितीला बदनाम केले जात असल्याचा आरोप अध्यक्ष आ. पारवे यांनी केला.
जालन्यात समितीकडून झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:47 AM