औताडे यांचा प्रत्यक्ष भेटींवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:48 AM2019-04-18T00:48:38+5:302019-04-18T00:49:00+5:30
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांनी त्यांच्या प्रचाराचा एक भाग म्हणून बुधवारी सकाळी जालन्यातील गुरू गणेश महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांनी त्यांच्या प्रचाराचा एक भाग म्हणून बुधवारी सकाळी जालन्यातील गुरू गणेश महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून त्यांनी येथे भेट दिली.
प्रारंभी त्यांनी गुरूगणेश महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन जैन साध्वींचे आशिर्वाद घेतले. यावेळी त्यांचे स्वागत श्रावक संघाचे अध्यक्ष गौतम रूणवाल, उपाध्यक्ष नरेंद्र लुणिया, सचिव विजय सुराणा, सहसचिव कचरूलाल कुंकूलोळ, डॉ. धरमचंद गादिया, सुदेश सकलेचा, संजय मुथा, स्वरूपचंद ललवाणी, भरत गादिया आदींची उपस्थिती होती.
यावेळी औताडे यांनी शहरातील विविध व्यापारी, उद्योजकांच्या भेटी घेतल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या समवेत विजय कामड आणि अन्य काँग्रेसचे पदाधिकारी हजर होते. औताडे यांनी सकाळनंतर अंबड शहरासह तालुक्यातील गावांना भेटी देऊन बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवून लोकांची दिशाभूल केल्याचे सांगितले. त्यांच्या समवेत झिरपी, रोहिलागड येथेही त्यांनी भेटी दिल्या.
गोरंट्याल यांची फेरी
जालना तालुक्यातील वाघ्रूळ, रामनगर, बाजीउम्रद, सोमनाथ जळगाव, मानेगाव तसेच अन्य गावांना गोरंट्याल यांनी भेटी दिल्या. तसेच तेथील ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांना औताडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांच्या समवेत शेख महेमूद, विजय चौधरी, गणेश चौधरी, विनोद यादव यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची उपस्थिती होती. औताडे यांच्या प्रचारासाठी जनमानसातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती गोरंट्याल यांनी दिली. दरम्यान गेल्या चार टर्मपासून दानवे हेच निवडून येत असले तरी, गेली पाच वर्षे वगळता दानवेंनी पाहिजे तसा विकास केला नसल्याचे ते म्हणाले. गुरूवारी जालन्यातून पदयात्रा काढणार असल्याचे गोरंट्याल म्हणाले.