बदनापूर : अवैध उत्खनन दंडाच्या ३२७ कोटी रुपये महसुली रकमेतून बदनापूर मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी निधीची उपलब्धता व्हावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही माजी आमदार संतोष सांबरे यांनी दिली.
माजी आमदार संतोष सांबरे यांनी अवैध व बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध लढा उभारून शासनाच्या महसुलामध्ये ३२७ कोटी रुपयांचा दंडरूपी कर उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जमा केला आहे. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गांतर्गत येणाऱ्या केळीगव्हाण ग्रामस्थांच्यावतीने माजी आमदार संतोष सांबरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी किसान सेना जिल्हाप्रमुख भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, युवासेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, भरत सांबरे, शिवाजी मदन, भरत मदन, रवी मदन, किशोर मदन, संभाजी मदन, प्रल्हाद मदन, विठ्ठलराव मदन, अनिरुद्ध मदन, प्रभाकर मदन, निवृत्ती मदन, सुभाष मदन, कृष्णा मदन, लक्ष्मण सुरुशे, विनायक जाधव, गिरधारी जांगीड, नवनाथ मदन, भास्कर सुरुसे, कैलास मदन, शंकर मदन, रावसाहेब सुरुसे, दादाराव मदन, सखाराम मदन, परमेश्वर मदन, सोमनाथ मदन यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित हाेते.
फोटो