लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जगातील १६ वेगवेगळ्या देशातील २६ युवक-युवतींचे जालन्यात सोमवारी सायंकाळी आगमन झाले. लायन्स क्लबच्या इंटनॅशनल युथ एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत हे परदेशी पाहुणे जालन्यात आले होते. आषाढी एकादशी असल्याने त्यांचे स्वागत अस्सल मराठमोळ्या पध्दतीने टोपी आणि भगवा रूमाल गळ्यात घालून करण्यात आले. स्वागतच्यावेळी विठ्ठल- रूक्मिणी चे रूप धारण केलेल्या युवकांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.येथील बँेकेट मधुर हॉलमध्ये हा अंत्यत आगळवेगळा सोहळा पार पडला. लायन्स क्लबचे येथील पदाधिकारी पुरूषोत्तम जयपुरियांसह त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी जालन्यात अशा प्रकारचा कार्यक्रम व्हावा यासाठी विशेष पुढाकार घेतला.सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात तैवान, फ्रान्स, जर्मनी, आदी देशातील युवक-युवतींनी भारातातील त्यांच्या मित्रांसोबत ओळख करून घेतल्यावर ग्रुप डिस्कशन केले. त्यात भारत आणि त्यांच्या देशातील संस्कृती, आलेल्या पाहुण्यांचे आदारतिथ्य, तेथील रोजगार संधी, युवकांचा असलेला कल यावर चर्चा झाली. या कार्यक्रमातून जगात कुठल्याही मुद्यावरून वाद झाल्यास तो सहजासहजी सुटावा तसेच एकमेकांच्या देशातील चालीरीतींची माहिती व्हावी या हेतूने या शांतीदूतांच्या भूमिकेतून हे परदेशी युवक जालन्यात आले. ते दोन दिवस जालन्यात राहणार असल्याची माहिती लायन्सचे अलिबाग येथील पदाधिकारी प्रवीण सरनाईक यांनी दिली.ज्या प्रमाणे परदेशातील युवक येथे येतात त्याच धर्तीवर भारतातील अनेक युवक-युवतींना या उपक्रामातून परदेशात जाण्याची संधी मिळते. जवळपास ४८ युवकांना ही संधी मिळाली असल्याचे नाईक म्हणाले. यावेळी रिजन चेअरमन नवल मालू यांची प्रमुख उपस्थिती होती.भारतीय संस्कृतीचे आकर्षण व अप्रूप४यावेळी येथे आलेल्या परदेशी मुला-मुलांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, भारतात विविध प्रकारचे धर्म तेथील संस्कृती आणि देवाची आराधना करण्याच्या पध्दती बद्दल आकर्षण आहे. भारतात असलेल्या सुंदर निसर्गाचे त्यांनी कौतुक केले. भारतात परदेशी पाहुण्यांकडे मोठ्या विलक्षण नजरेने पाहिले जात असल्याबद्दल अप्रूप वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पाणीपुरी, आंबा आणि चपाती हे व्हेजिटरियन खाणे आवडत असल्याचे अनुभव युवकांनी शेअर केले. यावेळी तैवान : व्हीकी यावॉन, जॉर्जीया : एलेना, फ्रांन्स : डियाने, मॅक्सीको : करिना, फ्रांन्स : मार्टीन यांनी या प्रतिक्रिया दिल्या.
पाणीपुरी, आंबा व चपातीवर परदेशी युवक फिदा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 1:22 AM