शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

आगामी लोकसभा निवडणुकीत जालन्यात खोतकर विरुद्ध दानवे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:39 AM

जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असून, भाजप, शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबईत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेनेने एकला चलो रे चा नारा देत आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा ठराव संमत केला. या ठरावाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असून, भाजप, शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका म्हणजे शिवसेनेला गतवैभव पुन्हा मिळविण्याची संधी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.एक लोकसभा आणि पाच विधानसभा मतदार संघ असलेला जालना जिल्हा एके काळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. तेव्हा जालन्यातून अर्जुन खोतकर, अंबडमधून शिवाजी चोथे आणि बदनापूरमधून नारायण चव्हाण हे शिवसेनेचे तीन-तीन उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे जालना जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनला होता. पण काळानुसार राजकीय समीकरणे बदलत गेली आणि आज शिवसेनेचा एकच आमदार आहे. आक्रमक शैली आणि हिंदू अस्मिता याभोवती शिवसेनेचे राजकारण गेली ३५ वर्षे फिरत राहिले आहे. त्यातच आता स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पाचही विधानसभा मतदार संघात पक्षाला आता शिवसैनिकांची फौज तयार करण्यासह पक्ष बांधणीसाठी पुरेसा वेळही मिळणार आहे. जिल्ह्यात निवडणुका झाल्यास भाजप, शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी तिरंगी लढत अटळ आहे. त्यातच भाजपचे सत्ताकारणातून अर्थकारण आणि अर्थकारणातून सत्ताकारण असे धोरण अवलंबल्याने इतर पक्षांचे उमेदवार तसे तग धरणे कठीण असल्याचे चित्र आहे. कार्यकर्त्यांची फळी आणि योग्य नियोजन या आधारेच शिवसेनेला जिल्ह्यात निवडणुका लढवाव्या लागणार आहेत. एकूणच या निवडणुका म्हणजे शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.युती आणि आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेत्यांनी आपापले बालेकिल्ले मजबूत केले होते. मात्र गेल्या काही दिवसांत लोकसभेच्या उमेदवारीवरून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमधील शाब्दिक चकमक वाढत गेली. आरोप-प्रत्यारोप व आव्हान-प्रतिआव्हानाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. राजकीय मोर्चेबांधणी आणि निवडणुकीची तयारी भाजपसह अन्य पक्षांच्या नेत्यांनी आतापासूनच सुरु केली आहे. जनसंपर्कासह जनाधार वाढविण्यावर या नेत्यांचा भर असल्याचे दिसून येत आहे. जालना, बदनापूर, घनसावंगी, परतूर आणि भोकरदन या पाचही विधानसभा मतदार संघात निवडणूक पूर्वीसारखी सोपी राहिलेली नाही. त्यातच आर्थिक, राजकीय आणि सामाजिक गणिते कशी जुळतात, यावरही सर्व उमेदवारांचे यशापयश अवलंबून राहणार आहे. शिवसेनेचे मराठवाड्याचे नेते म्हणून उदयास आलेले राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे, माजी आ. शिवाजी चोथे, सहसंपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण, उपनेते लक्ष्मण वडले, माजी आ. संतोष सांबरे, जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, भाऊसाहेब पाऊलबुद्धे, बाबासाहेब इंगळे, रमेश गव्हाड, मनीष श्रीवास्तव, पंडित भुतेकर, विष्णू पाचफुले यांच्यासह सर्व तालुके आणि जिल्ह्यातील पदाधिकाºयांना निवडणुकांसाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. सेनेतील पदाधिका-यांनी गटातटाचे राजकारण सोडून एकत्र येत एकदिलाने काम करण्याची गरज आहे. तरच शिवसेनेला पूर्ववैभव प्राप्त होऊ शकणार आहे.शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्याने लोकसभा मतदारसंघातही हा पक्ष आपला उमदेवार रिंगणात उतरवणार आहे. तर पक्षादेश जो असेल तो आपल्याला मान्यच असेल, अशी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची भूमिका आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपतर्फे खा. रावसाहेब दानवे, शिवसेनेतर्फे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेस आघाडीचाही उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहे. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार, हे निश्चित आहे.