जालना : जालना शहर कचरामुक्त करण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. सामनगाव येथे यापूर्वीच घनकचरा प्रकल्पाचे काम सुरू असून, याचाच एक भाग म्हणून आता रेवगाव रोडवर यापूर्वी पालिकेचे डपिंग ग्राऊड होते. तेथे आज घडीला मोठ-मोठे कच-याचे ढीग आहेत. त्याची शास्त्रशुध्द पध्दतीने विल्हेवाट लावून त्या कचºयापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने सव्वाचार कोटी रूपयांची तरतूद केल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.गुरूवारी या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना नगराध्यक्षा गोरंट्याल म्हणाल्या की, जालना शहरातील कचरा उचलण्यासाठी यापूर्वी जवळपास ४० पेक्षा अधिक घंटागाड्या तैनात केल्या आहेत, त्याचे चांगले परिणाम दिसून येत असून, चौकांमध्ये दिसणारे कचºयाचे ढीग हे आता स्वच्छ झाले आहेत. नागरिकांच्या घरोघरी जाऊन या घंटागाड्या कचºयाचे संकलन करतात.आता घनकचरा प्रकल्पाचा भाग असलेल्या ही कचरा निर्मूलन मोहीम असून, यासाठी जालना पालिकेने निविदा मागवली होती. पुणे येथील एका पर्यावरण संदर्भात काम करणाºया कंपनीने सर्वात कमी दराची निविदा भरल्याने त्यांची निविदा स्किारण्यात आली असल्याचे गोरंट्याल म्हणाल्या. ही निविदा अन्य निविदांच्या तुलनेत १४ टक्यांनी कमी होती त्यामुळे पालिकेचे जवळपास सव्वातीन लाख रूपयांची बचत झाली असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी शेख महेमूद, विजय चौधरी, गणेश राऊत, मेघराज चौधरी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.कचºयावर प्रक्रिया : उपस्थितांना थेट प्रात्यक्षिक दाखवलेपत्रकार परिषद संपल्यावर नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी सर्व पत्रकारांना रेवगाव येथील डपिंग ग्राऊंड नेऊन नव्याने आणलेल्या मशीनचे प्रात्याक्षिक दाखवले. यातून कचºयातील वेगवेगळे टाकाऊ पदार्थ वेगळे करून त्यापासून खत निर्मिती कशी होते. हे दर्शवण्यात आले.एकूणच येत्या तीन महिन्यात रेवगाव येथील हे कचºयाचे डोंगर भूईसपाट होतील असेही त्यांनी सांगितले. घनकचरा प्रकल्पाचे काम आता गतीने मार्गी लागेल, अशी आशा निर्माण झाली आहे. गेल्या दहा वर्षापासून हा प्रकल्प या ना त्या कारणाने लांबणीवर पडला होता.
कचरा निर्मूलनासाठी चार कोटींचा प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:15 AM
जालना शहर कचरामुक्त करण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. सामनगाव येथे यापूर्वीच घनकचरा प्रकल्पाचे काम सुरू असून, याचाच एक भाग म्हणून आता रेवगाव रोडवर यापूर्वी पालिकेचे डपिंग ग्राऊड होते.
ठळक मुद्देसंगीता गोरंट्याल : रेवगाव मार्गावरील कचऱ्याचे डोंगर होणार भुईसपाट, कचºयापासून कंपोस्ट खताची निर्मिती, शेतकऱ्यांना होणार लाभ