लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कलश सीड्स प्रा. लि. तर्फे कंपनीच्या आवारात ५ ते ८ जानेवारीदरम्यान पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.कंपनीच्या संशोधन विभागाने अथक परिश्रमातून व नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे उत्पादित केलेल्या भाजीपाला (संकरित) बियाणांद्वारे लावलेल्या सर्व जातींचे निरीक्षण याद्वारे शेतकरी, वितरक व शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना करता यावे, जेणेकरून शेती हा अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. याची प्रचिती व्हावी हा या पीक प्रात्यक्षिकाचा मुख्य उद्देश आहे. या पीक प्रात्यक्षिकांमध्ये (ओपन डे) टोमॅटो, कांदा, वांगी, मिरची, कोबी, पत्ताकोबी, गाजर, सिमला मिरची, मुळा यांच्या विविध गुणधर्म असलेल्या वाणांचे निरीक्षण करता येईल. या व्यतिरिक्त विदेशी भाजीपाल्याच्या लाल कोबी, हिरवी कोबी, सवाय कॅबेज, ब्रुसेल्स स्प्राउट, शंखाच्या आकाराची कोबी रॅमनिस्को, चेरी टोमॅटो, पार्सली, कोलिब्री यांची उभी पिकेही पाहता येतील. बायोटेक लॅब, टिश्यू कल्चर लॅब, मॉलिक्युलर लॅब, जी.ई.लॅब यांच्या स्टॉलमध्ये तज्ज्ञांकडून माहिती दिली जाईल. याद्वारे शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, विविध संशोधनांवर शेतकरी व विक्रेता वितरक चर्चा करता येईल.दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमानंतर त्यांच्यासाठी मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. ५ व ६ जानेवारी रोजी मेघा संपत रजनी, ७ जानेवारीला आरती पाटणकर यांच्या महाराष्ट्राची लोकधारा हे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. ८ जानेवारी रोजी हे पीक प्रात्यक्षिक सर्वांसाठी खुले राहील. विभागातील शेतक-यांनी या पीक प्रात्यक्षिकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांसह व्यवस्थापनाने केले आहे.५ जानेवारी रोजी मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, आंध्र प्रदेश व तेलंग ६ जानेवारी रोजी उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल, आसाम, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा व राजस्थान आणि ७ जानेवारीला महाराष्ट्र व विदर्भातील विके्रेते, वितरक व प्रगतिशील शेतकरी या उपक्रमास भेट देणार आहेत.सार्क देशाचे (नेपाळ, बांगला देश, श्रीलंका, पाकिस्तान व अन्य) वितरक देखील या पीक प्रात्यक्षिकाच्या पाहणीसाठी येणार आहेत.
कलश सीड्सचा चारदिवसीय पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 12:57 AM