लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : जबरी चोरी, घरफोडी व लुटमार करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना अंबड पोलिसांनी शुक्रवारी खंडाळा येथून ताब्यात घेतले. संतोष रायभान भोसले (३५, रा पाथर्डी जि अहमदनगर), सिध्दार्थ उर्फ कमट चव्हाण (२२), पप्प्या रहेमान चव्हाण (२५), रविंद्र उर्फ डेंग्या रहेमान चव्हाण (२०, तिघे रा. खंडाळा ता. पैठण जि. औरंगाबाद) असे संशयित आरोपीची नावे आहे.सक्रांतीच्या आदल्या रात्री अंबड शहरापासून काही अंतरावर असणा-या ईश्वर नगर तांडा येथे पोलीस कर्मचारी चंद्रकला दिनेश पवार यांच्या घरावर चोरांनी डल्ला मारत त्यांच्या गळ््यातील मनी गंठण, सोन्याचे पॅडोल व तीन मोबाईलवर हातसाफ करुन चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले होते.या गुन्ह्याचा तपास करत असतांना शुक्रवारी पोलिसांना खब-यामार्फत माहिती मिळाली की, सदरील गुन्ह्यातील आरोपी हे पाचोड-पैठण रोडवरील खंडाळा-चोंडाळा येथील गायरानांमध्ये आहे. या माहितीवरुन ३५ जणांच्या पथकाने शनिवारी सकाळी खंडाळा शिवारात सापळा रचून यासीन उर्फ पप्या रेहमान चव्हाण, सिध्दार्थ उर्फ कमट भैय्या चव्हाण, रविंद्र उर्फ डेंग्या रेहमान चव्हाण, संतोष रायभान भोसले या चौघांना जेरबंद केले.ही कारवाई पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधिक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी सी. डी. शेवगण, पोलीस निरीक्षक अनिरुध्द नांदेडकर, पोउपनि. सुग्रीव चाटे, पोउपनि. दीपक वाघ, एन. एम. शेख, सपोनि. अनिल परजणे, पोउपनि. हनुमंत वारे, पोउपनि. सुनिल बोडखे, कर्मचारी यु. व्ही. चव्हाण, एस. एम. बरडे, संतोष वनवे, लोखंड, खैरकर, गोफणे, लहाने, जाधव, घोडके, महिला पोलीस कर्मचारी शेख, कांबळे, पवार यांच्यासह पाचोड पोलीसांनी मदत केली.२३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीया चारही जणांना पोलिसांनी अंबड न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २३ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.नातेवाईकांचा गोंधळपोलीस या चारही आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेले. मात्र, आरोपींच्या नातेवाईकांनी गोंधळ घालून तसेच विवस्त्र होऊन अटक करण्यापासून अडथळा करण्याचा प्रयत्न केला.
चार सराईत गुन्हेगार जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 1:01 AM