शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

चार हजार शेतकरी बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 1:07 AM

बदनापूर तालुक्यात कपाशीवरील बोंडअळीमुळे पिकांच्या नुकसानीपोटी वितरित केलेल्या अनुदानापासुन ३ हजार ९४६ बाधितग्रस्त शेतकरी वंचित राहिले असून त्यांचे अनुदान बँकेत जमा झालेले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : तालुक्यात कपाशीवरील बोंडअळीमुळे पिकांच्या नुकसानीपोटी वितरित केलेल्या अनुदानापासुन ३ हजार ९४६ बाधितग्रस्त शेतकरी वंचित राहिले असून त्यांचे अनुदान बँकेत जमा झालेले नाहीतालुक्यात खरीप हंगाम २०१७ मध्ये बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी बाधितग्रस्त शेतक-यांना राज्य शासनाने आर्थिक मदत देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला परंतु झारीतील शुक्राचार्यांमुळे हे अनुदान अनेक शेतक-यां पर्यंत अद्याप पोहोचलेले नाही़ तालुक्यात बोंडअळीच्या नुकसानीपोटी एकुण ६ कोटी ५४ लाख ३३ हजार २९६ रूपये अनुदान तालुका प्रशासनाला प्राप्त झाले होते यापैकी तालुक्यातील ३५ गावामधील १७०९५ शेतक-यांच्या एकूण ९४८७ हेक्टर बाधीत क्षेत्राला एकूण ६ कोटी ४९ लाख ५९ हजार ३६५ रूपये बाधित शेतक-यांच्या विविध बँकांमधील शाखांमधे जमा करण्यात आले यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावांमधील शेतक-यांचे बँक खाते क्रमांक घेण्याबाबत संबंधित तलाठी व कृषि सहायकांना सूचना करण्यात आल्या होत्या परंतु उंटावरून शेळ्या राखण्याची सवय असणा-या काही कर्मचा-यांकडून अनेक गावांमधील अनेक शेतक-यांचे बँक खाते क्रमांक घेतले गेले नाहीत. परिणामी तहसील कार्यालयात जमा केलेल्या गावनिहाय शेतक-यांच्या याद्यांमध्ये अनेक शेतक-यांचे बँक खाते क्रमांक देण्यात आलेले नाही़ त्यामुळे बोंडअळीमुळे बाधित असलेल्या शेतक-यांना अनुदान असतानाही आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागले़तालुक्यात हिवरा येथे १७१ शेतकरी, हिवरा दाभाडी ३६ शेतकरी, हालदोला १४१ शेतकरी, सोमठाणा ३८० शेतकरी, सिंधी पिंपळगाव ६ शेतकरी, सायगाव २५३ शेतकरी सागरवाडी ४६,शेलगाव १४४, सिरसगाव १०३, विल्हाडी ११३, वाघ्रूळ दाभाडी १८९ वाघ्रुळ डोंगरगाव २७७, वाकुळणी ९१,वंजारवाडी ९४, रोषणगाव २९५, राळा १०, राजेवाडी २६०, राजणगाव ३४, मेव्हणा २३, माळेगाव १७१,मालेवाडी २२, मानदेवळगाव ११३, मात्रेवाडी ३, मांडवा १७०, मांजरगाव २९४, भाकरवाडी ७, बुटेगाव ५१, पानखेडा ४४, नानेगाव १८८, वाल्हा ३४, रामखेडा १६, म्हसला ९०, भातखेडा ५५ पाडळी १४ इ. गावांमधील एकूण ३९४६ शेतक-यांचे अनुदान बँकेत गेलेले नाही त्यामुळे या शेतक-यांना आता शासनाकडून अनुदान आल्यानंतर बोंडअळीचे अनुदान मिळणार आहे़ पहिल्या टप्प्यात पाठविलेल्या बोंडअळीच्या अनुदानात तालुक्यातील केवळ वरूडी या गावातील पूर्ण शेतक-यांचे बँक खाते क्रमांक दिलेले आहेत तसेच यावेळी प्रथमच प्रशासनाकडून प्रत्येक बँकांच्या शाखानिहाय सुमारे साडेतीनशे ते चारशे धनादेश बनवून संबंधित शाखांमध्ये जमा केले त्यामुळे विविध शाखांमध्ये तातडीने निधी जमा झाला. शासनाकडून उर्वरित गावांना बोंडअळी अनुदानाची रक्कम मिळेनातालुक्यातील अद्यापही ५७ गावांमधील शेतक-यांना बोंडअळीचे अनुदान मिळाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :cottonकापूसgovernment schemeसरकारी योजना