लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : मोदी सरकार देशातील जनतेला भूलथापा देऊन सत्तेत आले. परंतु हे सरकार सर्वच आघाडीवर अयशस्वी ठरले. देशातील व राज्यातील शेतकरी संपविण्याचा विडा सरकाने उचलल्याचा आरोप अखील भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य भीमराव डोंगरे यांनी केला.केंद्र सरकारची चार वर्ष पूर्ण होत असल्याने शनिवारी अंबड येथे काँग्रेसच्या वतीने काळा दिवस पाळण्यात आला. तसेच यानिमित्त तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी प्रदेश सचिव बाबूराव कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर पवार, तालुकाध्यक्ष विठ्ठलसिंग राजपूत, उपनगराध्यक्ष केदार कुलकर्णी, डॉ. राहुल डोंगरे, प्रकाश नारायणकर, नगरसेवक जाकेर डावरगावकर, शेख रज्जाक , मुस्तार्क, वैजिनाथ डोंगरे, संभाजी गुढे, प्रल्हाद उगले, बाबासाहेब घोलप आदींची उपस्थिती होती.डोंगरे म्हणाले, की मोदी सरकारच्या काळातील अनेक योजना, घटना, देशात वाढलेली महागाई, मेटाकुटीस आलेली जनता, पेट्रोल डिझेल दरवाडीच्या माध्यमातून सरकार सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा घालत आहे. विविध घटनेचा संदर्भ देऊन स्पष्ट केले. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला.
मोदी सरकारची ४ वर्षे विश्वासघाताची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 1:05 AM