लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील नवीन औद्योगिक वसाहतीत गोपाल ओमप्रकाश झांझरी यांच्या शिवा आणि पंकज एंटरप्रायझेसमध्ये मंगळवारी मध्यरात्री आठ ते दहा चोरट्यांनी मिळून दरोडा टाकला. वॉचमनचे हातपाय बांधून त्याला दुसऱ्या खोलीत डांबून चोरट्यांनी विविध साहित्य लंपास केले.येथील नवीन औद्योगिक वसाहतीत झांझरी यांची ट्रान्सफॉर्मर दुरूस्तीची कंपनी आहे. मंगळवारी मध्यरात्री दोन वाजेच्या दरम्यान आठ ते दहा चोरट्यांनी कंपनीत प्रवेश करून प्रारंभी सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधले. कंपनीतील तांबे आणि पितळी धातूंच्या वस्तूंसह टीव्ही, एक दुचाकी आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा तेरा लाख ८७ हजार रूपयांचा माल लांबविला. या प्रकरणी चंदनझिरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औद्योगिक वसाहतीत चौदा लाखांचा दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:51 AM