शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

आरोग्य विभागात नौकरी लावून देण्याचे अमिष, सिल्लोड व भोकरदन तालुक्यातील ९ लोकांना ५८ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 7:01 PM

आरोपींनी उमेदवारांना खोटे नियुक्तीपत्र दिले, काही दिवस कामही करुन घेतले. पण, नंतर अधिकाऱ्यांमार्फत हे बनावट असल्याचे उघड झाले.

सिल्लोड: आरोग्य विभागात नौकरी लावून देण्याचे अमिष दाखवून सिल्लोड व भोकरदन तालुक्यातील  ९ लोकांना ५८ लाखात गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी ८  लोकांविरुद्ध रविवारी गुन्हे दाखल केले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नौकरीचे आमिष दाखवून गंडविणाऱ्या आरोपीचे नाव पंकज वामन कोल्हे उर्फ जैस्वाल(रा.आशीर्वाद अपार्टमेंट तिसरा मजला भगतनगर नागपूर), वराडे पूर्ण नाव माहीत नाही आरोग्य विभागातील अधिकारी पुणे, साळवे पूर्ण नाव माहीत नाही, उपजिल्हा रुग्णालय पुसद जिल्हा यवतमाळ,  पाटील पूर्ण नाव माहीत नाही, उपजिल्हा रुग्णालय पुसद, राऊत पूर्ण नाव माहीत नाही, उपजिल्हा रुग्णालय पुसद, अरुण पाटील(टीव्ही सेंटर औरंगाबाद)  व इतर दोन अशा आठ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

फिर्यादी अंबादास उखाजी सोनुने (वय ४३ वर्षे) व्यवसाय शेती(रा.कोळी कोठा ता. भोकरदन जिल्हा जालना) यांच्याकडून  १ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबरला वरील आरोपींनी ५८ लाख रुपये सिल्लोड शहरातील भराडी पेट्रोल पंपाजवळ  घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी दिली. अंबादास सोनुने यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वरील आरोपींविरुद्ध ४२० प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यातील फिर्यादी अंबादास सोनुने याना आरोपी पंकज वामन कोल्हे यांना, त्यांचे नातेवाईक उमेदवार याना आरोग्य विभागामध्ये नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांचे मार्फत सिल्लोड व भोकरदन तालुक्यातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या उमेदवारांच्या पालकांकडून ५८ ,00,000 लाख रुपये घेतले.

खोटे नियुक्ती पत्र दिलेयातील आरोपी क्रमांक २ ते ५  यांच्या मदतीने उमेदवार मुलांचे आरोग्य विभागामध्ये खोटे नियुक्तीपत्र तयार करून फिर्यादी व त्यांचे नातेवाईक उमेदवार यांना देऊन उमेदवार यांचेकडून पुसद तसेच गुरुगोविंद सिंग जिल्हा रुग्णलाय नांदेड येथे हजर करून घेऊन एकमहिना, दीड महिना, ४० दिवस ९ उमेदवारांकडून आरोग्य सेवक म्हणून कामे करून घेतली.

असे फुटके बिंग...उमेदवार मुलांना पर्मनंट ऑर्डर तुमच्या पत्यावर पाठवू असे आरोपी क्रमांक १ ते ८ यांनी सांगून उमेदवार मुलांना घरी पाठवले. ८ ते १० दिवसाच्या अंतराने उमेदवार मुलांना त्यांचे राहत्या घरी पत्यावर नियुक्ती पत्र पोस्ट द्वारे प्राप्तही झाले. त्यामध्ये उमेदवार मुलांना जिल्हा हिवताप अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचेकडे हजर होणे बाबत आदेश असल्याने यातील उमेदवार जिल्हा हिवताप अधिकारी यवतमाळ यांचेकडे हजर झाले. पण तेथील अधिकारी यांनी सदर नियुक्तीपत्र पाहून ते बनावट असल्याचे सांगितले.

फिर्यादिस आपली व नातेवाईक मुलांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोनुने यांनी  आरोपी पंकज वामन कोल्हे यांना आमचे पैसे परत द्या अशी मागणी केली. पण, कोल्हे यांनी तुमचे दोन उमेदवारांचे ९ लाख रुपये आरोपी अरुण पाटील याच्याकडे जमा असल्याचे सांगितले. सोनुने यांनी त्यांना संपर्क केला असता पाटील याने फिर्यादीस ९ लाख रुपयांचा युको बँकेचा धनादेश दिला, मात्र तो चेक वटला नाही.  आपली वरील लोकांनी फसवणूक केल्याची खात्री झाल्याने  त्यांनी तक्रार दिली त्या वरून वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

मोठे रॅकेट...आरोग्य विभागात नौकरी लावून देणारे मोठे रॅकेट असून त्याचा तपास सुरू आहे. सिल्लोड व भोकरदन तालुक्यातील फसवणूक झालेल्या सर्व उमेदवारांचे जाब जवाब घेतल्यावर ठीक ठिकाणी सापळा रचून आरोपीना अटक केली जाईल. यात मोठं मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.- अशोक मुदिराज पोलीस निरीक्षक सिल्लोड शहर पोलीस ठाणे.

टॅग्स :JalanaजालनाPoliceपोलिसfraudधोकेबाजी