लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : अंबड शहरा पासून चार किलोमिटरवर असलेल्या मौजे शिरनेर येथील महिलांनी गुरूवारी विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावामध्ये टँकर सुरु करण्यात यावे, त्याच बरोबर चारा छावणी चालू करणे, रोजगार हमीची कामे सुरु करणे, तलावातील गाळ काढणे, पाच वर्षांपासून फुटलेल्या तलावाची दुरुस्ती करणे या मागण्या निवेदनात समावेश होता.तालुक्यात अनेक गावांमध्ये अशा प्रकारच्या समस्या वाढल्या आहेत गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत नसल्यामुळे नागरिकांना लांब शेतातून विहीरी वरुन पाणी शेंदून आणावे लागत आहे. त्यातच पाण्याची पातळी खोल गेली असून, सध्या कडक उन्ह पडत आहे, त्यामुळे सर्व बाजूने नागरिक हैराण झाले आहेत.या निवेदनावर अशोक काजळकर, पाराजी वैद्य, भरत गायके, आकाश कारके, माया गायकवाड, आशा म्हस्के, पार्वती म्हस्के, संगीता मस्के यांच्या सह इतर महिलांच्या स्वाक्ष-या आहेत.अनेक गावामध्ये टंँकरच्या दोन फे-या असताना टँकर एकच फेरी करत आहे. त्यामुळे एका फेरीची पैसे वरच्या वर उचलले जात आहेत. यामध्ये शासकीय कर्मचारी सहभागी असल्याचा आरोपही यावेळी केला आहे.
पाण्यासह व इतर मागण्यासाठी महिलांचा तहसीलवर मोर्चा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 1:14 AM