लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मंगळवारी शहरासह तालुक्यात कडकडत्ी बंद पाळण्यात आला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणी साठी कायगाव टोका येथील युवक काकासाहेब शिंदे यांनी जे एक प्रकारचे बलिदान दिले ते समाज कदापि विसरणार नाही असे सांगून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. असे असतानाच अशा घटना पुन्हा कोणीही करू नयेत असे आवाहनही करण्यात आले. शिवाजी महाराज झालेल्या सभास्थळी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या.यावेळी ह़भ़प़ संतोष महाराज आढवणे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणा बाबत मार्गदर्शन करून मराठा क्रांती मोर्चाचे पुढील दोन दिवसात काय कार्यक्रम होणार आहेत यांची माहिती देऊन सर्वानी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे असे आवाहनही त्यांनी केले.जाफराबादेत कडकडीत बंदजाफराबाद : राज्यभरात महाराष्ट्र बंदच्या हाकेला जाफराबादेतील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून मोठा प्रतिसाद दिला. सकल मराठा समाज जाफराबाद तालुक्याच्या वतीने मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे यांनी गोदावरी नदीत जलसमाधी घेतली. त्यांना यावेळी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. जाफराबाद शहरात सकाळी १० वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालय जाफराबाद येथून पायी मोर्चा काढत विविध घोषणा देत सरकारचा निषेध केला.बदनापूर येथे मोर्चाबदनापूर : शहर व तालुक्यात मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला मंगळवारी चांगला प्रतिसाद मिळाला संपुर्ण बाजारपेठ बंद होती आंदोलकांनी शहरात मोर्चा काढून मुख्यमंत्री आणि अधिकाºयां विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शहर व तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी शहरात मराठा क्रांती ठोक मोर्चा च्या वतीने एक मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.
भोकरदन, जाफराबाद तालुक्यात बंदला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:57 AM