लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पन्नास वर्षापूर्वी जालन्या सारख्या अविकसित शहरात येऊन राख दाम्पत्याने वैद्यकीय सेवेचे रोपटे लावले होते. ते आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. एकूणच डॉ. राख आणि त्यांच्या पत्नी स्व. कृष्णा राख यांनी माणसे जोडण्याचे कार्य केले, अशी आदरांजली उपस्थितांनी वाहिली.शुक्रवारी रात्री शंकरराव राख यांचे निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी रात्री शोकाकुल वातावरणात रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री पंडित दौंड, आ. राजेश टोपे, माजी आ. कैलास गोरंट्याल, जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आ. सुरेश जेथलिया, माजी आ. कल्याण काळे, माजी आ. नारायण मुंडे, अॅड. भास्कर आव्हाड, अॅड. ब्रह्मानंद चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे, विलास नाईक, इक्बाल पाशा, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, माजी आ. धोंडीराम राठोड, विलास औताडे, किशोर अग्रवाल, सुनील रायठठ्ठा, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, माजी आ. शिवाजी चोथे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत, विनित सहानी, रमेश तौरावाला, भाऊसाहेब घुगे, जगत घुगे, प्रा. संजय लकडे, कामगार नेते अण्णा सावंत आदींची उपस्थिती होती.मान्यवरांनी दिला आठवणींना उजाळायावेळी श्रध्दांजली अर्पण करताना अनेक मान्यवरांनी डॉ. राख यांच्या आठवणींना उजाळा दिला. वेळोवेळी डॉ. राख यांनी कशी मदत केली आणि त्यांच्यामुळे कुठले चांगले परिणाम झाले, याबद्दलही अनेकांनी अनुभव विषद केले.डॉ. राख यांनी वैद्यकीय सेवा करतानाच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही एक कणखर आणि भावूक नेतृत्व म्हणून आपली प्रतिमा उंचावल्याचे सांगितले.
शंकरराव राख यांच्यावर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:25 AM