पत्रकार परिषदेला चंदनझिरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे, कदीमचे प्रशांत महाजन यांची उपस्थिती होती. खिरडकर म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून तौर याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्याच्या अनुषंगाने एमपीएडीएप्रमाणे जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या अनुषंगाने एक वर्षासाठी स्थानबद्धतेचे आदेश काढण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, डीवायएसपी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे, पीआय सुभाष भुजंग यांनी अहवालाची छाननी केली. शुक्रवारीच तौर यास उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, अंमलदार नंदलाल ठाकूर, अनिल काळे, अजय फोके, अनिल चव्हाण यांनी औरंगाबाद येथील कारागृह हर्सूल येथे नेऊन स्थानबद्ध केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी गजानन तौरला केले स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:29 AM