लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जालन्यातील अॅड. राजेभाऊ ढवळे यांनी जालना ते सेवाग्राम अशी धावण्याची गांधी संदेश दौड प्रारंभीली आहे. बुधवारी सकाळी ६ वा. माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी हिरवा झेंडा दाखवून ढवळे यांच्या दौडला प्रारंभ झाला.जुना जालना भागातील गांधी चमन येथे प्रारंभी महात्मा गांधीच्या पुतळ्यास अॅड. राजेभाऊ ढवळे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी जालना ते सेवाग्राम ३०० किलोमीटरचे अंतर ढवळे हे महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी पूर्ण करुन सेवाग्राम येथे या दौडची सांगता करणार आहेत.बुधवारी सकाळी त्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्य मित्रपरिवारासह अन्य मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. यात महात्मा गांधी अध्ययन केंद्राचे प्रमुख प्रा. यशवंत सोनुने, वकील संघाचे अध्यक्ष लक्ष्मण उढाण, उपाध्यक्ष दिनेश भोजने, जिल्हा सरकारी वकील विपुल देशपांडे, अॅड. जगदीश बडवे, अॅड. प्रदीप जाधव, अॅड. सुरेश कुलकर्णी, अॅड. किशोर राऊत, अॅड. सतीश तवरावाला, अॅड. बाबासाहेब इंगळे, अॅड. अशोक मते, अॅड. गजानन जक्कलवार, अॅड. सचिन खटकळ, अॅड. राहुल चव्हाण, अॅड. डी. के. कुलकर्णी, घनश्याम साळुंके, अॅड. वसंत पवार, अॅड. संदीप हराळ, राम गव्हाणे, अॅड. भीमाशंकर देशमाने, अॅड. सुजित मोटे, बालासाहेब भुतेकर आदींची उपस्थिती होती.या दौडच्या वेळी सिंदखेडराजा, किनगाव राजा, मेहकर, मालेगाव जहांगीर, कारंजा लाड, पुलगाव, वर्धा आणि सेवाग्राम असा मार्ग राहणार आहे.ढवळे हे दररोज सरारी ५० किलोमीटरचे अंतर धावणार आहेत. राजेभाऊ यांचे सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.
गांधी संदेश दौड; राजेभाऊ ढवळे सेवाग्रामकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 1:00 AM