Ganesh Chaturthi 2018 : जालन्यात मिरवणुकीने झाले गणरायाचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 06:21 PM2018-09-13T18:21:01+5:302018-09-13T18:22:46+5:30

शहर व परिसरात आज श्री गणरायांचे भक्तांनी उत्साहात वाजत गाजत स्वागत केले

Ganesh Chaturthi 2018: The arrival of Ganaraya in Jalan by procession | Ganesh Chaturthi 2018 : जालन्यात मिरवणुकीने झाले गणरायाचे आगमन

Ganesh Chaturthi 2018 : जालन्यात मिरवणुकीने झाले गणरायाचे आगमन

Next

जालना : शहर व परिसरात आज श्री गणरायांचे भक्तांनी उत्साहात वाजत गाजत स्वागत केले. शहरातील सिंधी बाजार परिसरात गणरायांच्या मूर्तीची खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच सार्वजनिक गणेश मंडळ पदाधिकारी व भक्तांची झुंबड उडाली होती. 

या ठिकाणाहून श्री गणरायांच्या मूर्तीची भव्यदिव्य वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यानंतर मूर्तींची सार्वजनिक ठिकाणी व घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी सर्व भक्तांमध्ये गणरायांच्या आगमनाने उत्साह संचारला होता. गणपती बप्पा की जय असा जयघोष करत स्वागताच्या मिरवणूका निघाल्या. सिंधी बाजारामध्ये यंदा मोठ्या प्रमाणात गणरायांच्या लक्षवेधक मूर्ती उपलब्ध आहेत. आज सकाळी ९ वाजता सिंधी बाजारातून गणरायांच्या मूतीर्ची वाजतगाजत मिरवणूक निघाली आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. मिरवणुकीत पारंपारीक वाद्य, लेझिम, ढोल, संबळ पथक सहभागी होते.

Web Title: Ganesh Chaturthi 2018: The arrival of Ganaraya in Jalan by procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.