भायडीत उत्साहात
भोकरदन : तालुक्यातील भायडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डिजिटल वर्ग कार्यशाळा गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर यांच्या मार्गदर्शनखाली घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी तालुक्यातील २० शाळांमधील मुख्याध्यापक, तंत्रस्नेही शिक्षक, केंद्रप्रमुख, गटसाधन केंद्रातील साधन व्यक्ती हजर होते.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
जालना : शहरालगत असलेल्या राजपूतवाडी येथील रस्त्यांसह सामनगाव रोड, गंगाधरवाडी, गैबनशहावाडी या रस्त्यांच्या कामांना गती द्यावी, यासाठी सामनगाव - राजपूतवाडी विकास कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना नुकतेच निवेदन दिले आहे. यावेळी धर्मराज खिल्लारे, किशोर ताजी, आत्मानंद भक्त, संतोष गाजरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
परतूर : केंद्र आणि राज्य सरकारकडून बहुजनविरोधी धोरणे आणि कायदे रद्द करावेत, अशी मागणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. या निवेदनावर श्रीपत हिवाळे, असीम शेख, महेंद्रकुमार वेडेकर, गौतम पाईकराव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. मागणी मान्य न केल्यास आंदोलन केले जाईल.
विकास वेडेकर, गजभिये यांची निवड
जालना : महाराष्ट्र जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी विकास वेडेकर, तर सरचिटणीस म्हणून राजपाल गजभिये यांची निवड करण्यात आली आहे. जयनगर येथे संघटनेची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ गजभिये, सचिन गंगावणे, संजय साळवे, विष्णू जाधव, मदन जाधव, सूर्यकांत भालेराव, विजय बनसोड, सुषमा गजभिये, रंजना वाहुळे आदींची उपस्थिती होती.
रिक्त पदे भरण्याची ग्रामस्थांची मागणी
घनसावंंगी : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील पोलीस चौकीत उपनिरीक्षकांसह पोलीस कर्मचाऱ्यांची पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पालकमंत्री राजेश टोपे यांना देण्यात आले आहे. कुंभार पिंपळगावात दररोज ४० ते ४५ गावांचा संपर्क असतो. येथील चौकीत पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.