लोकमत न्यूज नेटवर्कजालना : होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत येथील पोदार स्कूलची विद्यार्थिनी गार्गी गिरीश राखे हिने रजत पदक पटकावले आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या एका समारंभात भाभा आॅटोमिक रिसर्च सेंटरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ संतोष टकले यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्कॉलरशिप, प्रमाणपत्र आणि रजतपदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.जालना शहरातील तीव्र पाणीटंचाई आणि सांडपाण्याच्या समस्येवर उपाय सुचवणारा ड्रेन वॉटर, सेव्ह वॉटर हा प्रकल्प गागीर्ने सादर केला होता. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी मॅजिक सोक पिट आणि पाणीटंचाईवर वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प तिने सादर केला. मात्र हे उपाय यशस्वी होण्यासाठी जनजागृती अत्यंत कमी पडत असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यासाठी गार्गीने आपल्या परिसरात सर्वेक्षण करून या दोन्ही उपायांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. त्यानुसार परिसरातील काही लोकांनी या उपायांचा अवलंब करायला सुरुवातही केली. या उपक्रमांची छायाचित्रांसह माहिती तिने आपल्या प्रकल्पास जोडली होती. वैज्ञानिक उपक्रमांना जनजागृतीची जोड हे तिच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्य ठरले. यासाठी तिला संजय टिकारिया, राजेश फदाट यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गार्गी राखे सिल्व्हर पदकाची मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:53 AM