जालना : येथील जिल्हा महिलाशासकीय रुग्णालयाने एका महिलेला मुलीच्या जागी मुलाचे प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेवरून जिल्हा महिला रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आला असून, कुटुंबियांनी डीएनए तपासणीची मागणी केली आहे.जाफराबाद येथील महिला रविवारी प्रसूतीसाठी शासकिय महिला बाल रुग्णालयात दाखल झाली होती. त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सदरील महिलेची प्रसूती झाली. परिचारिकेने सदर महिलेला मुलगा झाल्याचे सांगितले. तसेच तशी नोंद ही रजिस्टरमध्ये करुन घेतली. परंतू, त्यानंतर सदर महिलेकडे मुलगी देण्यात आली. यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता. रुग्णालयात नवजात मुलांची अदला बदल केल्याची ओरड नातेवाईकांनी केली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. यात प्रसूती करणाऱ्या परिचारिकेने चुकीने मुलगा झाल्याचे सांगून रजिस्टरवरही मुलगा झाल्याची नोंद केली असल्याचे समोर आले आहे.दरम्यान, या प्रकरणीनातेवाईकांनी डिएनए तपासणीची मागणी केली असून, या प्रकरणी कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे एकूणच महिला रूग्णालयातील निष्काळजीपणा समोर आला आहे.परिचारिकेसह मावशीवर कारवाई करणारडीएनए तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. डीएनएचा अहवाल आल्यानंतर प्रसूतीवेळेस परिचारिकेसह सोबत असलेल्या मावशीवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.- आर. एस. पाटील, चिल्हा शल्य चिकित्सक.माझ्या मुलीची प्रसूती झाली तेव्हा आम्हाला मुलगा झाला असे सांगण्यात आले. तसेच रजिस्टरवरही मुलगा झाल्याची नोंद करण्यात आली; परंतु त्यानंतर आमच्या हातात मुलगी देण्यात आली. माझ्या मुली सोबत आमच्या घरातील एक महिला होती; परंतु तरीही डीएनए तपासणीची मागणी करीत आहोत.- अजीम शेख.प्रसूती झालेल्या महिलेचे वडील
मुलीऐवजी दिले मुलाचे जन्म प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 1:18 AM