लोकमत न्यूज नेटवर्कजालना : निसर्गाच्या अवकृपेमुळे आपणा सर्वांना भीषण पाणीटंचाईचा मुकाबला करावा लागणार आहे. टंचाईच्या अनुषंगाने पिण्यासाठी पाणी व मजुरांच्या हाताला काम या बाबींचे सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले.जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी जालना मतदासंघाच्या पाणीटंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना राज्यमंत्री खोतकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, सभापती पांडूरंग डोंगरे, द्वारकाबाई खरात, सदस्य यादवराव राऊत, बबनराव खरात, रऊफभाई परसुवाले, श्रमती अरुणा सदाशिव शिंदे, पुष्पाताई चव्हाण, पं.स. सदस्य कैलास उबाळे, जनार्दन चौधरी, संतोष मोहिते, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, संजय इंगळे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डाकोरे आदींची उपस्थिती होती.राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, जानेवारी ते जून या कालावधीसाठी पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. आपत्तीच्या परिस्थितीमध्ये यंत्रणांनी आपली जबाबदारी गांर्भीयाने पार पाडावी. पदाधिका-यांनी गटातटाचे राजकारण न करता टंचाई परिस्थितीचा खंबीरपणे मुकाबला करण्यासाठी सज्ज राहावे. टँकरद्वारे पाणीपुरवठा हा शेवटचा पर्याय असून टंचाईच्या अनुषंगाने नळयोजनांची दुरुस्ती, तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना, खाजगी विहिरींचे अधिग्रहण आदी बाबींवर भर देण्यात यावे. त्याचबरोबरच २०० फुटावर पाणी लागणाºया हातपंप तातडीने मंजुरी देण्यात यावी. कुठल्याही पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित न करण्या सोबतच गावातच काम उपलब्ध करून द्यावे जेणेकरून स्थलांतर होणार नाही असेही खोतकर म्हणाले
पाणी उपलब्धतेसह हाताला रोजगार द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:59 AM