गोंदी/ शहागड : कुरण येथील नदी पात्रातून वाळूचीतस्करी करणाऱ्यास गोंदी पोलिसांनी गुरूवारी ताब्यात घेतले.मागील काही दिवसांपासून शहागड ते जोगलादेवीपर्यंतच्या गोदावरी नदी पात्रात गोंदी पोलीस नजर ठेवून आहेत. गुरूवारी एका ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळूतस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून सपोनि. एम. पी. खोपडे यांनी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नदी पात्रात धाड टाकून एक विना नंबरचा ट्रॅक्टर पकडला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुध्द शहागड पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून ५ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई महेश तोटे, सुशील करांडे, अविनाश पगारे यांनी केली. विशेष म्हणजे एकीकडे ही करवाई होत असतांनाच साठवून ठेवलेले वाळू साठ्यातूनही सर्रासपणे चोरी होत असल्याचे चित्र आहे.
गोंदी पोलिसांची वाळू तस्करांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 12:25 AM