लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची माहिती जाणून घेण्यासाठी आपण शेतक-यांशी थेट संवाद साधत आहोत. सोमवारी आ. कैलास गोरंट्याल यांनी शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली.गोरंट्याल यांनी सोमवारी जालना विधानसभा मतदार संघातील वंजार उमरद, वरखेडा, इंदलकर वाडी, पोखरी, कुंभेफळ, वाघ्रुळ येथील शेतक-यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, राम सावंत, विनोद यादव, अरुण घडलिंग, बबन वाघ, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, तालुका कृषी अधिकारी सुखदेवे, मंडळ कृषी अधिकारी गोविंद पोळ, मल्हारी पाटील, रामदास साहारे, हरीदास वाघ, बंडू वाघ, सरपंच कमलाकर वाघ, शिवाजी वाघ, गणेश सहारे, नारायण वाघ, देवा वाघ, संदिप वाघ, वंसत राठोड आदींची उपस्थिती होती.कैलास गोरंट्याल यांनी नुकसानीच्या पाहणीदरम्यान शेतक-यांशी संवाद साधला. शेतक-यांचे प्रश्न, शासकीय योजनांची अंमलबजावणी, पथकाकडून होणा-या पंचनाम्यासह इतर माहिती जाणून घेतली. तसेच शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
गोरंट्याल दुसऱ्या दिवशी बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 12:39 AM