लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्याची निर्मिती होऊन ३७ वर्षे पूर्ण होत आहेत. जिल्हा निर्मिती ही सहजासहजी मिळालेली नाही. त्यासाठी मोठा संघर्ष त्या काळातील लोकांनी केला होता, संघर्षानंतर अखेर १ मे १९८१ रोजी जालना जिल्हा निर्मितीची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांनी केली. अन् जालनेकरांचा आनंद द्विगुणित झाला होता.आता जिल्हा झाल्याने विकासाची पहाट उजाडेल आणि इतर विकसित जिल्ह्यांप्रमाणे जालनाही नावारूपास येईल अशी आशा होती, ती आजही कायम आहे. परंतु गेल्या ३७ वर्षाचे अवलोकन केल्यास लातूरच्या तुलनेने जालना विकास आणि सोयी, सुविधा तसेच शिक्षणाच्या बाबतीत कोसोदूर असल्याचे वास्तव नाकारून चालणार नाही.जालना जिल्हा निर्मितीसाठी चार दशकापूर्वी ज्यांनी संघर्ष केला होता, त्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो म्हणजे माजी खासदार बाळासाहेब पवार, मोहनलाल गोलेच्छा, बाबूलाल पंडित, मनोहरराव जळगावकर, बळीराम यादव, माणिकचंद बोथरा, रमेशचंद्र चोविश्या, डॉ. शंकरराव राख, शशिकांत पटवारी, अॅड. भा.गं.देशपांडे, प्रा. भगवान काळे यांच्यासह अन्य अनेक नावे घेता येतील. या सर्वाच्या संघर्षातून औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्याचे विभाजन करून जालना जिल्ह्याची नर्मिती झाली. या निर्मितीमुळे जिल्हा पातळीवरील आवश्यक असणारी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा व सत्र न्यायालय, पोलीस अधीक्षक यासह अन्य महत्वाची कार्यालये येथे आली. त्यामुळे औरंगाबाद आणि परभणी येथे विविध कार्यालयीन कामाकजासाठी होणारी ये-जा थांबली. असे असतानाच आज काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या संस्था,कारखाने वगळता हवा तसा अपेक्षित विकास न झाल्याची खंत आजही जालनेकरांच्या मनात सल करून आहे. लातूर आणि जालन्याची नेहमीच तुलना केली जाते. मात्र लातूरा जे राजकीय नेतृत्व मिळाले तसे नेतृत्व जालन्याला न मिळाल्याचेही दिसून येते. आज लातूर शहराची प्रगती आणि जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जालन्याची अवस्था कशी आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. औरंगाबाद नंतर औद्योगिक विकासात जालन्याने भरारी घेतली. मात्र ती केवळ येथील स्थानिक उद्योजकांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे, बियाणे, स्टील, दालमिल, जिनिंग उद्योगामुळे जालन्याचे नाव आज सातासमुद्रापार पोचले आहे. परंंतु त्यात सरकारचा म्हणून वाटा हवा तो नगण्यच आहे. जे काही सहकारी उद्योग होेते, ते आज बंद पडले आहेत. त्यात जालना सहकारी साखर कारखाना, जालना सूतगिरणी, सहकार तत्वावरील सहयोग प्रकल्पाचा समावेश आहे. याच प्रमाणे औद्योगिक वसहातीतील झलानी, त्रिमुर्ती, हिंदूस्तान फेरेडो हे खासगी बडे उद्योगही बंद पडल्याने हजारो कामागांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. आज जे काही उद्योग सुरू आहेत, त्यात बियाणे, स्टील, जिनिंग आणि दाळमिलचा समावेश करता येईल. एनबारबी, विनोदराय इंजिनिअर, एल.जी.बालकृष्णन आदी थोडे बहुत उद्योगांनी त्यांच्या दर्जेदार उत्पादनामुळे निर्यातीत मोठी झेप घेतली आहे. परंतु सरकारच्या प्रयत्नातून गेल्या ३६ वर्षात एकही मोठा उद्योग जिल्ह्यात येऊ शकला नाही. याला अपवाद केवळ माजी खासदार कै. अंकुशराव टोपे म्हणता येतील, त्यांनी समर्थ आणि सागर कारखाना, मत्स्योदरी जिनिंग, मत्स्योदरी शिक्षण संस्था, समर्थ बँक, समर्थ दूग्ध उत्पादन संघ या माध्यमातून जिल्ह्यात सहाकार चवळ रूजविली. हा त्यांचा वसा त्यांचे पुत्र आ. राजेश टोपे तेवढ्याच तन्मयतेने पुढे नेत आहेत. बियाणे क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी आणून कै. बद्रीनारायण बारवाले यांनी मोठी क्रांती केली होती.जालना जिल्हा निर्मिती होऊन आता ३७ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे आपण प्रौढ झलो आहोत. त्यामुळे मोठ्यांनी मोठे मन ठेवून जिल्हा व जालना शहराच्या विकासाची धोरणे व अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. शेती, सिंचन, शिक्षण याचा विकास जास्तीत जास्त कसा करता येईल, यावर मंथन होऊन एक धोरणे ठरले पाहिजे. आज जिल्ह्यात महिलांचे सक्षमीकरण करण्याची जास्त गरज आहे. मुलींचे शाळागळतीचे प्रमाण रोखण्यासाठी आजही मोठे काम करण्याची संधी सत्ताधाºयांना आहे.- आ. राजेश टोपे, घनसावंगीगेल्या ३० वर्षापासून आपण राजकारणात आहोत, मात्र त्यावेळी सत्ता आमच्या पक्षाची नव्हती. आता केंद्र आणि राज्यात आमचे सरकार असल्याने विकासाची गंगा जिल्ह्यात खेखून आणली आहे. भविष्यातही विकास कामांसाठी हवा तेवढा निधी आणणार आहे. आज ड्रायपोर्ट, जालना शहरासह जिल्ह्यातील रस्ते मजबुतीकरणासाठी हजारो कोटी रूपयांचा निधी आणला असून, ड्रायपोर्ट, आयसीटी तसेच सीडस्पार्क च्या माध्यमातून विकास साधण्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत.येत्या काही वर्षात याचे सर्व चांगले परिणाम दिसून, विकासाला गती येणार आहे.- खा. रावसाहेब दानवे,भाजपा प्रदेशाध्यक्ष
दर्जा मिळाला.. विकासाची प्रतीक्षा कायम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 1:05 AM