लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मानवी जीवनाला सफल करण्यासाठी रामकथा उपयुक्त आहे. रामकथा श्रवण केल्याने मानवी जीवनातून वाईट विचारांचा नाश होेतो. त्यासाठी रामकथेच्या माध्यमातून राम आपल्या हृदयात ठेवा, असे प.पू. गोवत्स राधाकृष्ण महाराज म्हणाले.जालना येथील श्रीराम गोभक्त सेवा समितीकडून स्व. रामेश्वर लोया सभा मंडप, गौरक्षण पांजळापोळ, जालना येथे प.पू. गोवत्स राधाकृष्ण महाराज यांच्या अमृतमय वाणीतून रामकथेस मंगळवार पासून प्रारंभ झाला.प्रारंभी दुपारी २ वाजता संभाजीनगर परिसरातील बालाजी मंदिरापासून कथा स्थळापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी भक्तांना उपदेश देताना राधाकृष्ण महाराज म्हणाले की, प्रत्येक मानवाने जीवन जगत असताना सेवाकार्य चांगले करावे.
गोवत्स महाराजांच्या रामकथेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 1:11 AM