लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : दुष्काळाचा सामना करण्यासाठी विद्यमान शासन समर्थ असून, चारा पाणी व दुष्काळी कामे पडू देणार नसल्याची ग्वाही पालक मंत्री बबनराव लोणीकर यांनी आयोजित टंचाई बैठकीत दिली.येथील वरद मंगल कार्यालयात शुक्रवारी टंचाई बैठकीचे अयोजन करण्यात आले होते. यावेही जि.प. सदस्य राहूल लोणीकर, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, रमेश भापकर, नामदेव काळदाते, सभापती रामेश्वर तनपुरे, सरपंच संपत टकले उपस्थित होते यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, सद्या सर्व दुष्काळ सदृष्य परिस्थीती आहे. या परिस्थिीतीचा सामना सर्वानी एकत्र येवून करण्याची गरज आहे. राज्य शासन या परिस्थीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. मागील चार वर्षात काळात विविध विकास योजना राबवल्या. रस्ते, पाणी पुरवठा योजना, वीज या प्रश्नावर प्रामुख्याने भर देवून आम्ही या समस्या प्रथम दुर केल्या. शेतकऱ्यांना सर्वात मोठी कर्जमाफी दिली. बोंडअळीचे अनुदान दिले. राज्यात मराठवाड्यात सर्वाधीक पाणी उपसा केला जातो, या उपशावर निर्बंध अणावे लागतील. मोकाट पध्दतीने पाणी देणे बंद करून सुक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर करावा लागेल असे लोणीकर यावेळी म्हणाले. शासनाने शेतकºयांसाठी विविध योजना आणल्या आहेत, त्याचा लाभ घेवून शेतकºयांनी आपले जीवनमान उंचावण्याची गरज आहे. दुष्काळी परिस्थितीत उदभवल्यास काही कमी पडू दिले जाणार नाही असे आश्वासन लोणीकर यांनी दिले. दुष्काळी परिस्थितीत जबाबदार अधिकारी कर्मचाºयांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. या काळात दिरंगाई करणाºयांची गय केली जाणार नाही अशी तंबी लोणीकर यांनी अधिकारी कर्मचाºयांना दिली. यावेळी सुधाकर बेरगुडे, प्रविण सातोनकर, संदीप बाहेकर, कृष्णा आरगडे, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधीकारी विविध विभागाचे अधीकारी कर्मचारी उपस्थित होते.
दुष्काळाचा सामना करण्यास शासन समर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:31 AM
दुष्काळाचा सामना करण्यासाठी विद्यमान शासन समर्थ असून, चारा पाणी व दुष्काळी कामे पडू देणार नसल्याची ग्वाही पालक मंत्री बबनराव लोणीकर यांनी आयोजित टंचाई बैठकीत दिली.
ठळक मुद्देबबनराव लोणीकर : परतूर टंचाई बैठक़, सर्व विभागप्रमुखांना तत्पर राहण्याचे आदेश