दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही- संपतकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:21 AM2018-12-22T00:21:31+5:302018-12-22T00:22:09+5:30

सर्वसामान्यांमध्ये सरकारच्या धोरणाविरूध्द प्रचंड नाराजी आहे. असे प्रतिपादन काँगे्रस समितीचे सचिव तथा राज्याचे सह प्रभारी संपतकुमार यांनी केले.

Government is not serious about drought- Sampatkumar | दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही- संपतकुमार

दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही- संपतकुमार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना केंद्र आणि राज्यातील सरकार पाहिजे तेवढे गांभीर्याने घेत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये सरकारच्या धोरणाविरूध्द प्रचंड नाराजी आहे. असे प्रतिपादन काँगे्रस समितीचे सचिव तथा राज्याचे सह प्रभारी संपतकुमार यांनी केले.
जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने संत गाडगेमहाराज पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पक्ष पातळीवरील नियोजनाचाही आढवा संपतकुमार यांनी घेतला. आगामी काळ हा निवडणुकांचा असल्याने सरकार वाटेल त्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करणार आहे. मात्र हे थांबवून वास्तव सामान्यांच्या लक्षात आणून देण्याचे काम काँग्रेसच्या पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी करावे असे आवाहन त्यांनी केला. प्रारंभी संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आ. सुरेशकुमार जेथलिया हे होते. यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल, बुथ कमिटीचे मराठवाडा समन्वयक माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, धोंडीराम राठोड, नारायण मुंडे, अ. भा. सदस्य भीमराव डोंगरे, कल्याण दळे व विजय कामड , ज्ञानेश्वर भांदरगे, राजाभाऊ देशमुख, सत्संग मुंडे, ज्ञानदेव बांगर, अ‍ॅड. विनायक चिटणीस, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, इक्बाल कुरेशी, अ‍ॅड.संजय खडके, वैभव उगले, जीवन सले, विनोद यादव आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष शेख महेमूद यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र राख यांनी केले तर आभार राम सावंत यांनी मानले.

Web Title: Government is not serious about drought- Sampatkumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.