जालना : नगरपालिकेच्या मालमत्ता कराची वसुली वाढण्याऐवजी थकबाकीचा आकडा वाढत आहे. विविध शासकीय कार्यालयांकडे पाणीपट्टी व मालमत्ता करापोटी पालिकेचे तीन कोटी आठ लाख रुपये थकले आहेत. थकबाकीदारांच्या मालमत्तांची पालिकेकडून जप्ती करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.नगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या कोट्यवधी रुपयांची थकबाकीची वसुली करण्यासाठी पालिकेने आता जप्ती मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. दहा हजारांच्यावर थकबाकी असणाºया मालमत्ता धारकांच्या आपल्याकडील पाणीपट्टी व मालमत्ता कर त्वरित भरावा, अन्यथा मनपा अधिनियम १५२ नुसार त्यांच्या मालमत्तांची जप्ती करण्यात येणार असून, जप्त मालमत्तांचा कलम १५६ नुसार लिलाव केला जाणार आहे. शहरातील सुमारे ५२ हजार मालमत्ता धारकांकडे पालिकेचे मालमत्ता करापोटी १२ कोटी २० लाख ७९ हजार रुपये तर पाणीपट्टीचे नऊ कोटी रुपये थकले आहेत. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा रुग्णालय, राज्य राखीव दल, जिल्हा परिषद इ. शासकीय कार्यालयांकडे मालमत्ता व पाणीपट्टीचे तीन कोटी आठ लाख, २५ हजार ६१५ रुपये थकले आहेत. रेल्वेस्थानक प्रशासनाकडे पालिकेची २३ कोटी रुपयांची पाणीपट्टी थक ली आहे. कर वसुलीसाठी नगरपालिकेचे पथक चकरा मारूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. थकबाकीच्या तुलनेत वसुलीची टक्केवारी केवळ तीन टक्के आहे. चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कराचे एक कोटी ७७ लाख, ३६ हजार रुपये तर पाणीपट्टीची केवळ ४९ लाख रुपयांची वसुली झाल्याचे कर अधीक्षक नारायण बिटले यांनी सांगितले.------------कोटचालू आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पालिका आता थेट जप्ती मोहीम राबविणार आहे. थकबाकीदार मालमत्ताधारकांनी आपल्याकडील कराचा भरणा करून जप्तीची कारवाई टाळावी.- संतोष खांडेकर, मुख्याधिकारी नगरपालिका.
शासकीय कार्यालयांकडे थकले तीन कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:41 AM