रमजान सुरू होताच फळांची भाववाढ
जालना : मुस्िम बांधवाचा पवित्र रमजान महिना बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. रमजानचा महिना आणि लॉकडाऊन यामुळे आता फळांच आवक पूर्वी प्रमाणे राहणार नसल्याचे लक्षात येताच ही दरवाढ झाली आहे. त्यातच मोसंबी, संत्री ही पूर्वी दहा ते १५ रूपांना दोन मिळत होत्या. त्या आता १५ रूपयांना मोसंबी तर संत्रीचा एक नग २० रूपयांना मिळत आहे. द्राक्षाचे दरही चाळीस रूपयांच्यावर पोहचले आहेत.
--------------------------------------------
जालन्यात पावसाचा मेघगर्जनेसह शिडकावा
जालना : शहरात बुधवारी सायंकाळी चार वाजेनंतर मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यावेळी जोरदार पाऊस पडेल अशी अपेक्षा होती. परंतु तो पडला नाही. परंतु जोरदार मेघगर्जनेसह हलकासास शिडकावा पडल्याने शहरातील रस्ते आले झाले होते. दुपारी यामुळे काहीवेळा विजेचा ललंडाव सुरू होता. या हलक्याश्या शिडकाव्यामुळे वातावरणातील उष्णता वाढली होती.