जालना : शासन म्हणते चर्चा करू. चर्चा करायची असेल तर इथं या. वेळ कशासाठी पाहिजे, किती पाहिजे आणि महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीतून आरक्षण देणार का ते सांगा. ते सांगितल्यानंतर आम्ही ठरवू वेळ द्यायचा की नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.
सर्वपक्षीय बैठक आणि शासनाच्या निर्णयाबाबत जरांगे पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधून भूमिका मांडली. सरकार आश्वासने देवून वेळ काढू भूमिका पार पाडत आहे. सर्वपक्षीयांची यापूर्वीही बैठक झाली होती. तीच बैठक पुन्हा झाली. बैठकीनंतर आणखी वेळ पाहिजे, असे सांगत आहेत. परंतु, वेळ किती पाहिजे, कशाला पाहिजे आणि सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार का ते सांगा. मग आम्ही मराठा समाजाशी चर्चा करून वेळ द्यायचा की नाही, ते सांगू, असेही जरांगे पाटील म्हणाले.
अरे-तुरे बोलले की वाईट वाटते कामराठा समाजातील युवकांचे मुडदे पडत आहेत. युवकांचे करिअर बरबाद होत आहे. परंतु, तुम्हाला वाईट वाटत नाही. परंतु, अरे-तुरे केले काही बोलले की तुम्हाला वाईट वाटते का असा प्रश्न जरांगे पाटील यांनी केला. यापुढे काही दिवस आपण स्वभावात बदल करू, त्यांना गोड बोलू, असेही ते म्हणाले.
आमचा आवाज कोणी दाबू शकत नाहीमराठ्यांचा आणि माझा आवाज कोणी दाबू शकत नाहीत. दुसऱ्या टप्प्यातील हे आरक्षण आंदोलन सुरू आहे. तिसरा आणि चौथा टप्पा बाकी आहे. मीडियाचा आवाज, आमचा आवाज बंद पडू देणार नाहीत. आमच्यावर अन्याय होवू देणार नाहीत आणि आपणही मराठा आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.
ही आरपारची लढाई : जरांगे पाटीलइंटरनेट बंद करण्यामागे शासनाचे षडयंत्र असू शकते. तुम्ही कितीही षडयंत्र करा आम्ही तुमच्या नेटवर चालणारे नाहीत. नेट बंद करून राज्याचे वातावरण दूषित करू नका. ही लढाई आरपारची आहे. आम्ही शांततेत आंदोलन करून लढू आणि आरक्षण मिळवू, असेेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.