शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

रस्त्याची पोलखोल, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारला जाग; केंद्रीय पथकाकडून पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 7:18 PM

सुमार दर्जाच्या रस्त्याची लक्तरे वेशीवर टांगल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे.

हस्तपोखरी (जालना ): अंबड तालुक्यातील हस्तपोखरी ते कर्जत या मॉडेल रस्त्याच्या दर्जाची नुकतीच पोलखोल झाली. जर्मन तंत्रज्ञानाने तयार करण्यात येत असलेल्या या रस्त्याची दुरवस्था व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून सामोर आल्यानंतर आता केंद्र आणि राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. शनिवारी केंद्रीय पथकाकडून रस्त्याची तपासणी करण्यात आली.

हस्तपोखरी ते कर्जत या ९.३ किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. जर्मन तंत्रज्ञान वापरून पहिल्यांदाच हा रस्ता करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात निकृष्ट दर्जामुळे हा रस्ता सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रस्त्यासाठी भरीव निधी मंजूर झाल्याने हा रस्ता जर्मन तंत्रज्ञान वापरून बनविण्यास सुरुवातही झाली. 

पहिल्या टप्प्यात या रस्त्यावर खडी टाकून त्याची दबाई करण्यात आली. त्यानंतर दोन महिने काम बंद राहिले. तेव्हापासून या रस्त्याकडे गुत्तेदार फिरकलाच नसल्याचे सांगण्यात येत आहे. वेळेत डांबरीकरण न झाल्याने रस्त्यावर टाकलेली खडी निखळून बाहेर पडली होती. नागरिकांची ओरड होताच थातूरमातूर पद्धतीने हा रस्ता तयार करण्यात आला असल्याचा आरोप आहे. येथील गावकऱ्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून रस्त्याच्या बोगस कारभाराची पोलखोल केली. रस्ता हाताने बाजूला करतांना सोशल मीडियावरील चित्रफितीत दिसून आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरात पोहोचलेल्या रस्त्याची चर्चा आता थेट केंद्र सरकारपर्यंत पोहोचली. यानंतर तडकाफडकी तीन सदस्यांचे पथक येथे दाखल झाले.

डांबराची तपासणीरस्त्याच्या बोगसगिरीचा व्हिडीओ दिल्लीपर्यंत पोहोचल्यानंतर आता येथून सूत्रे हलविण्यात येत आहेत. शनिवारी केंद्रीय पथकाकडून रस्त्याच्या कामाची तपासणी करण्यात आली. हे पथक खास रस्त्याची तपासणी करण्यासाठी येथे आले होते. पथकाकडून रस्त्यावर टाकण्यात आलेले डांबर, खडी यांची तपासणी करण्यात आली. तपासणी अहवाल दोन-तीन दिवसांत सादर करणार असल्याची माहिती आहे. पथकात योजनेचे डेप्युटी डायरेक्टर राकेश कुमार, यू. जी. साहू, विष्णू राय यांचा समावेश होता.

गुन्हे दाखल करणारकेंद्र सरकारच्या पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून हा रस्ता तयार करण्यात येत आहे. मात्र, सुमार दर्जाच्या रस्त्याची लक्तरे वेशीवर टांगल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे. तपासणी पथकाच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या मुख्य अभियंत्या सविता शालगर यांनी दिला आहे. यावेळी कैलास वाघ, भरत घुले, परमेश्वर आव्हाड, ज्ञानेश्वर घुगे, तुकाराम चेपटे उपस्थित होते.

टॅग्स :Jalanaजालना