जालना : बिलाचा चेक देण्यासाठी अंबड तालुक्यातील पावसे पांगरी येथील ग्रामसेविकेला १० हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलूचपत विभागाने पकडले. मनिषा महापुरे (३२, ह. मु. सुरंगेनगर अंबड) असे ग्रामसेविकेचे नाव आहे.तक्रादारांनी तीन महिन्यापूर्वी पावसे पांगरी येथे दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत नळ पाईलाईनचे काम केले होते. सदर काम हे १० लाख रुपयांचे असून, त्यापैकी तक्रारदारांना ७ लाख ३० हजार रुपयांचे बिल मिळाले. उर्वरित ९० हजार ७०० रुपयांचे बिल बाकी आहे. तक्रारदारांनी ग्रामसेविका महापुरे यांना बिलाचा चेक देण्याची विनंती केली असता, ग्रामसेविका महापुरे म्हणाल्या की, आम्हाला बिडीओ साहेबांना पैसे द्यावे लागतात. तेव्हा तुम्ही मला १० हजार रुपये द्या, त्या शिवाय चेक देणार नाही. तेव्हा तक्रारदारांनी लाच देण्यास मान्य केले. त्यानंतर ग्रामसेविका महापुरे यांनी तक्रारदारास ६० हजार रुपयांचा चेक दिला. व ३० हजार ७०० रुपयांचा चेक दिला नाही. त्यानंतर तक्रारदारांनी यांची तक्रार लाच लुचपत विभागाकडे केली.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक रविंद्र निकाळजे, पोनि. काशिद, पो.नि. व्ही. एल. चव्हाण, कर्मचारी संतोष धायडे, ज्ञानदेव जुंबड, मनोहर खंडागळे, अनिल सानप, उत्तम देशमुख आदींनी केली.अंबड पोलीस ठाण्यात गुन्हापंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, महापुरे यांनी १० हजार रुपयांची लाच स्विकारल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी ग्रामसेविका महापुरे यांच्याविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामसेविका अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:47 AM
बिलाचा चेक देण्यासाठी अंबड तालुक्यातील पावसे पांगरी येथील ग्रामसेविकेला १० हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलूचपत विभागाने पकडले. मनिषा महापुरे (३२, ह. मु. सुरंगेनगर अंबड) असे ग्रामसेविकेचे नाव आहे.
ठळक मुद्दे१० हजारांची लाच : लाचलूचपत विभागाची कारवाई