लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रोजगार हमी योजनेअंतर्गत खोदलेल्या विहिरीचा वापर करू देण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या तक्रार निवारण अधिका-यास लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले. वाटूर फाटा येथे रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. विष्णू साहेबराव खंडागळे (६५ रा.परतूर), असे लाच स्वीकारणा-या अधिकाºयाचे नाव आहे.या प्रकरणातील तक्रारदाराची मंठा तालुक्यातील कठाळा खुर्द येथे जमीन आहे. वाटणीपूर्वी या जमिनीवर तक्रारदाराच्या भावाने रोजगार हमी योजनूतन विहीर खोदली होती. विष्णू खंडागळे याने तक्रादाराची भेट घेतली. रोहयोतून खोदलेल्या विहिरीबाबत तक्रार प्राप्त झाली असून, विहिरीचा वापर करायाचा असेल तर दहा हजारांच्या लाच मागितली. मात्र, तक्रारदारांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने सापळा रचून खंडागळे यास पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. पोलीस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीखक विनोद चव्हाण, अशोक टेहरे, संतोष धायडे, प्रदीप दौंडे, संजय उदगीरकर, गंभीर पाटील, लव्हारे, चव्हाण, खंदारे यांनी ही कारवाई केली.
तक्रार निवारण अधिकारी जाळ््यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 1:03 AM